चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा

वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजना; ५४ किमी मार्गाच्या दुरुस्तीला गती

चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा

वीज ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे, लोडशेडिंगचे नियोजन, स्वतंत्र एजन्सीमार्फत कचऱ्याची विल्हेवाट, तसेच पाणीपुरवठा आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासनाने पायाभूत सुविधांच्या विकासासह वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यावर भर दिला आहे. उद्योजकांच्या अडचणी दूर करून उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तळेगाव आणि चाकण येथे भेट देत रस्ते दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. तसेच चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

वाहतूक कोंडीवर तातडीने काम

चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीच्या विविध ठिकाणांची पाहणी करून शिंदे यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी एम-६० हार्डनरचा वापर केला जात आहे. तसेच रस्त्यांवर थेट कास्टिंग केलेले पॅचेस बसवण्याचे काम सुरू आहे.

जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आणि एम-६ आरएमसी विथ हार्डनरच्या माध्यमातून खड्डे कमी वेळेत दुरुस्त करून अवजड वाहतूक तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्री-कास्ट पॅनेल बसवण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.

दर शुक्रवारी विशेष नोडल समितीची बैठक

औद्योगिक क्षेत्रातील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आता दर शुक्रवारी होणार आहे.

रस्ते, ड्रेनेज, फुटपाथ आणि स्ट्रीट लाईट्ससह औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत विशेष लक्ष दिले जाणार आहे.

५४ किमी मार्गाच्या दुरुस्तीला गती

तळेगाव ते शिक्रापूर या ५४ किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीला गती देण्यात येणार आहे. यासोबतच नाशिक फाटा-राजगुरुनगर रस्ता आणि औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची कामेही वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

रस्ते विकास करताना फुटपाथ, युटिलिटी आणि सायकल ट्रॅकचा समावेश करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

कामगारांसाठी वसाहती आणि मेट्रोचा विस्तार

औद्योगिक क्षेत्रात कामगारांचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी क्लस्टरच्या माध्यमातून कामगार वसाहती उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान, निगडी-चाकण, चाकण-राजगुरुनगर आणि तळेगाव-शिक्रापूर या मेट्रो मार्गांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत.

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी उपलब्ध

उद्योजकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंते आणि अन्य अधिकारी आठवड्यातून एक दिवस प्रत्यक्ष उपलब्ध राहणार आहेत. उद्योजकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी ‘मैत्री’ ॲपचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय वीज ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे, लोडशेडिंगचे नियोजन, स्वतंत्र एजन्सीमार्फत कचऱ्याची विल्हेवाट, तसेच पाणीपुरवठा आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

उद्योग स्थलांतराचा निर्णय बदलण्याची चिन्हे

शासनाच्या उपाययोजनांमुळे चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्यांवर तोडगा निघण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उद्योग बाहेर स्थलांतरित करण्याबाबत उद्योजकांच्या भूमिकेतही सकारात्मक बदल झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;