पुणे-पिंपरीत एफडीएची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या सहा हॉटेल-बेकरींचे परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाची स्वच्छता व अन्नसुरक्षेवर लक्ष केंद्रित; नियमभंग, अस्वच्छता आणि मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांमुळे सहा हॉटेल-बेकरींचे परवाने निलंबित

पुणे-पिंपरीत एफडीएची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या सहा हॉटेल-बेकरींचे परवाने निलंबित

विशेष मोहिमेत हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी तसेच विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान काही आस्थापनांमध्ये अस्वच्छता, मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवणे, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन आढळून आले.

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल, बेकरी, रेस्टॉरंट यांची तपासणी केली असता, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आस्थापनांचे परवाने निलंबित केले. याशिवाय कोंढवा बुद्रुक परिसरात विनापरवाना वाहतूक केला जाणारा ५९८ किलो मीठा मावा जप्त केला असून, त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.
या विशेष मोहिमेत हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी तसेच विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान काही आस्थापनांमध्ये अस्वच्छता, मुदत संपलेले खाद्यपदार्थ साठवून ठेवणे, तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन आढळून आले.
ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असलेल्या या प्रकारांची गंभीर दखल घेत आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातही कारवाई केली असून, तेथील हॉटेलांवर कारवाई केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार! दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार!
दापोडी परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती...
आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम
मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!
कृष्णानगर स्पाईन रस्त्याच्या सेवा रस्त्यावरील बेकायदेशीर अवजड
नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा
वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार