नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा

'तत्वम फाउंडेशन'तर्फे गुरुकुलमच्या 350 लेकरांसोबत साजरी झाली स्नेहाची राखीपौर्णिमा

नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा

तत्वम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ठिकेकर म्हणाले की, सणांचा खरा आनंद हा समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांसोबत वाटून घेण्यातच असतो. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आमच्या सामाजिक कार्याची खरी ताकद असून, त्यांच्याशी जोडलेली ही नात्यांची आणि विश्वासाची वीण अधिक घट्ट करण्याचा आमचा निरंतर प्रयत्न राहील. 

चिंचवड: रक्ताच्या नात्यांपलीकडे जाऊन समाजातील उपेक्षित घटकाला प्रेमाची आणि आपुलकीची ऊब देणे हीच खरी सणांची सार्थकता असते, याचा प्रत्यय चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलममध्ये आला. वंचित, भटके आणि विमुक्त समाजातील मुलांच्या चेहऱ्यावर उत्सवाचा खरा आनंद फुलवण्याच्या उदात्त भावनेतून 'तत्वम सोशल फाउंडेशन'च्या वतीने गुरुकुलममधील तब्बल 350 मुला-मुलींसोबत अनोखा रक्षाबंधन सोहळा आणि स्नेहभोजनाचा संवेदनशील उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. 


उपक्रमादरम्यान फाउंडेशनने नेलेल्या  राख्यांनी वातावरण भावूक झाले होते. गुरुकुलममधील मुलींनी तेथील मुलांना मायेची राखी बांधली, तसेच उपस्थित फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनाही राखी बांधत अनोखा जिव्हाळा जपला. रक्षाबंधन हा केवळ रूढी परंपरेतील सण नसून समाजातील दुर्लक्षित घटकांप्रती वाटणारी माणुसकी, आदर आणि सामाजिक बांधिलकीची ती एक प्रतिज्ञा आहे, ही भावना यावेळी अधोरेखित झाली. 

याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत व समाजसेवक पद्मश्री गिरीशकाका प्रभुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी अशा आत्मीय उपक्रमांची नितांत गरज आहे. विशेषतः तत्वम फाउंडेशनच्या माध्यमातून सुशिक्षित तरुण वर्ग एकत्र येऊन सामाजिक जबाबदारीचे भान जपत असल्याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले, तसेच हे सेवाकार्य अविरत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. 


तत्वम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ठिकेकर म्हणाले की, सणांचा खरा आनंद हा समाजातील दुर्लक्षित व वंचित घटकांसोबत वाटून घेण्यातच असतो. या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच आमच्या सामाजिक कार्याची खरी ताकद असून, त्यांच्याशी जोडलेली ही नात्यांची आणि विश्वासाची वीण अधिक घट्ट करण्याचा आमचा निरंतर प्रयत्न राहील. 

WhatsApp Image 2026-08-30 at 4.37.21 PM
या भावूक सोहळ्यानंतर सर्व 350 मुलांसाठी अत्यंत प्रेमाने आणि तृप्तीने भरवलेल्या स्नेहभोजनाने (अन्नदान) मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलवले. या हृदयस्पर्शी उपक्रमासाठी तत्वम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र ठिकेकर, यांच्यासह सचिव वंदना चौहान, खजिनदार मनीषा पिसाळ यांच्यासह सदस्य आयुष चौहान, संदीप पिसाळ, श्रीराम घाटूळ आणि रजनी मांडले आदींनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार! दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार!
दापोडी परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती...
आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम
मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!
कृष्णानगर स्पाईन रस्त्याच्या सेवा रस्त्यावरील बेकायदेशीर अवजड
नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा
वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार