Dadasaheb Phalke Awards 2026 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पटकावले तब्बल ६ पुरस्कार!

आर्यन खान, समय रैनासह कोणी मारली बाजी? पाहा संपूर्ण यादी

Dadasaheb Phalke Awards 2026 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पटकावले तब्बल ६ पुरस्कार!

Dadasaheb Phalke Awards 2026 Full Winners List : मुंबईत पार पडलेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२६ मध्ये रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने ६ पुरस्कारांवर मोहर उमटवली. सैयारा, कांतारा: चॅप्टर १, टेलर स्विफ्ट आणि समय रैना यांनीही विविध विभागांत बाजी मारली असून संपूर्ण विजेत्यांची यादी जाहीर झाली आहे.

Dadasaheb Phalke Awards 2026 : मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स (DPIFF) २०२६ च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी, २० नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईत हा भव्य सोहळा पार पडला असून, अधिकृत एक्स हँडलवरून यंदाच्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे.

चित्रपट, टेलिव्हिजन, वेब मालिका आणि संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यात रणवीर सिहगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने तब्बल सहा पुरस्कार पटकावत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यापाठोपाठ अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या ‘सैयारा’ चित्रपटाने चार पुरस्कारांवर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, जागतिक पॉप आयकॉन टेलर स्विफ्ट आणि लोकप्रिय कॉमेडियन समय रैना यांनाही यंदाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

‘धुरंधर’चा षटकार; रणवीर सिंह सर्वोत्कृष्ट अभिनेता (Dhurandhar Wins 6 Awards)

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि रणवीर सिंहच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासह ६ पुरस्कार पटकावले. आदित्य धर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, शाश्वत सचदेव सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, तर अक्षय खन्नाला विशेष सन्मान व धर-देशपांडे यांना ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट निर्माते’ घोषित केले.

‘सैयारा’ची जादू कायम; अनित पड्डा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Saiyaara Takes 4 Honours)

‘सैयारा’ने ४ पुरस्कार जिंकले. अनित पड्डा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली; तर शीर्षक गीताला वर्षातील सर्वोत्कृष्ट गीत, फहीम अब्दुल्लाला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि इरशाद कामिल यांना सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला.

टेलर स्विफ्ट, समय रैना आणि ओटीटी विजेत्यांचा गौरव (Taylor Swift, Samay Raina & Web Series Winners)

टेलर स्विफ्ट वर्षातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कलाकार, करण औजला वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकार आणि समय रैना सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार ठरला. वेब मालिका विभागात ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ सर्वोत्कृष्ट वेब मालिका व आर्यन खान सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला; जयदीप अहलावत सर्वोत्कृष्ट अभिनेता व शेफाली शाह सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

मालिका आणि सहायक कलाकारांचा सन्मान (Television & Supporting Cast Honours)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला ‘टेलिव्हिजन सीरिज ऑफ द इयर’ व स्मृती इराणी यांना विशेष सन्मान मिळाला. विनीत कुमार सिंह सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता व रितेश देशमुख सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता ठरला. समीक्षक विभागात ‘कांतारा: चॅप्टर १’ सर्वोत्कृष्ट चित्रपट, ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता व यामी गौतम धर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली.

आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि जीवनगौरव पुरस्कार (International Categories & Lifetime Honours)

‘अवतार: फायर अँड अॅश’ सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट, मायकेल बी. जॉर्डन सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय अभिनेता व पॉल थॉमस अँडरसन सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक ठरले. जेम्स कॅमेरून, कमल हासन आणि इलैयाराजा यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘धुरंधर’चा दबदबा; प्रमुख चित्रपट आणि अभिनय पुरस्कार (Main Film & Acting Awards)

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : धुरंधर
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : रणवीर सिंह, धुरंधर
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अनित पड्डा, सैयारा
  • सर्वोत्कृष्ट निर्देशक : आदित्य धर, धुरंधर
  • वर्षातील सर्वोत्कृष्ट निर्माते : आदित्य धर, ज्योती देशपांडे आणि लोकेश धर, धुरंधर
  • सहायक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता : विनीत कुमार सिंह, छावा
  • नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता : अक्षय खन्ना, धुरंधर
  • विनोदी भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता : रितेश देशमुख, हाउसफुल ५
  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रणकार : अरविंद एस. कश्यप, कांतारा: चॅप्टर १
  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : सँडी मास्टर, कुली – मोनिका
  • सर्वोत्कृष्ट पटकथा आणि संवाद : रेशु नाथ, हक
  • समीक्षक आणि विशेष सन्मान (Critics & Special Honours)

    • समीक्षकांची पसंतीची सर्वोत्कृष्ट चित्रपट : कांतारा: चॅप्टर १
    • समीक्षकांची पसंतीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता : ऋषभ शेट्टी, कांतारा: चॅप्टर १
    • समीक्षकांची पसंतीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : यामी गौतम धर, हक
    • सर्वोत्कृष्ट लघुपट : माधुरी – एंड इज बिगिनिंग (Madhuri- End is beginning), सैयद शाहिद खान
    • सिनेसृष्टीत उत्कृष्ट योगदान : कमल हासन
    • संगीतसृष्टीत उत्कृष्ट योगदान : इलैयाराजा
    • आंतरराष्ट्रीय सिनेमात उत्कृष्ट योगदान : जेम्स कॅमेरून (James Cameron)

    संगीत, विनोद आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार (Music, Comedy & International Awards)

    • वर्षातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कलाकार : टेलर स्विफ्ट
    • वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकार : करण औजला
    • वर्षातील सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार : समय रैना
    • वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे : सैयारा (सैयारा)
    • सर्वोत्कृष्ट गीतकार : इरशाद कामिल (सैयारा – शीर्षक गीत)
    • सर्वोत्कृष्ट संगीत निर्देशक : शाश्वत सचदेव (धुरंधर)
    • सर्वोत्कृष्ट पार्श्व गायक : फहीम अब्दुल्लाह (सैयारा – शीर्षक गीत)
    • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दीर्घपट (Feature Film) : अवतार : फायर अँड अॅश (Avatar : Fire and Ash)
    • आंतरराष्ट्रीय दीर्घपटाचे सर्वोत्कृष्ट निर्देशक : पॉल थॉमस अँडरसन, वन बॅटल आफ्टर अनदर (One Battle After Another)
    • आंतरराष्ट्रीय दीर्घपटाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता : माइकल बी. जॉर्डन, सिनर्स (Sinners)
    • आंतरराष्ट्रीय दीर्घपटाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : जेसी बकले (Jessie Buckley) , हॅम्नेट (Hamnet)

    वेब मालिका आणि टीव्ही पुरस्कार (Web Series & Television Awards)

    • सर्वोत्कृष्ट वेब मालिका : द बॅड्स ऑफ बॉलीवूड
    • वेब मालिकेचे सर्वोत्कृष्ट निर्देशक : आर्यन खान (द बॅड्स ऑफ बॉलीवूड)
    • वेब मालिकेचा सर्वोत्कृष्ट अभिनेता : जयदीप अहलावत (पाताल लोक सीझन २)
    • वेब मालिकेची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : शेफाली शाह (दिल्ली क्राईम सीझन ३)
    • वेब मालिकेत सहायक सर्वोत्कृष्ट अभिनेता : विनय पाठक (ग्राम चिकित्सालय)
    • वेब मालिकेत नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : हुमा कुरेशी (दिल्ली क्राईम सीझन ३)
    • वर्षातील सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिका : तारक मेहता का उल्टा चष्मा
    • टीव्ही मालिकेचे सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमर उपाध्याय (क्योंकि सास भी कभी बहू थी २)
    • टीव्ही मालिकेची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : स्मृती इराणी (क्योंकि सास भी कभी बहू थी २)

२०१२ मध्ये स्थापन झालेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्सच्या माध्यमातून दरवर्षी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रातील विविध माध्यमांतील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव केला जातो. यंदाच्या सोहळ्यानेही कलाकारांना प्रोत्साहन देत मनोरंजन विश्वातील एक नवा अध्याय रचला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Dadasaheb Phalke Awards 2026 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पटकावले तब्बल ६ पुरस्कार! Dadasaheb Phalke Awards 2026 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पटकावले तब्बल ६ पुरस्कार!
Dadasaheb Phalke Awards 2026 Full Winners List : मुंबईत पार पडलेल्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स २०२६ मध्ये रणवीर...
Dadasaheb Phalke Awards 2026 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पटकावले तब्बल ६ पुरस्कार; आर्यन खान, समय रैनासह कोणी मारली बाजी? पाहा संपूर्ण यादी
मोशी कचरा डेपोचे तात्काळ विभाजन करून विकेंद्रीकरण करावे
दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार!
आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम
मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!