यंदा महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!

आमदार शंकर भाऊ जगताप यांचा पाठपुरावा; ८.३३ टक्के प्रथा बोनसासह ३० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

यंदा महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिवाळीचा प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यासाठी पाच वर्षांचा करारनामा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामगार कल्याण मंडळाने स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर केला. या मागणीसाठी आमदार शंकर जगताप यांनीही पुढाकार घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

पिंपरी, 14 ऑगस्ट  (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यंदा वाढीव सानुग्रह अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी देण्यात येणारा ८.३३ टक्के प्रथा बोनस आणि २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान यामध्ये वाढ करून आता ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने उपसूचनेसह मंजुरी दिली आहे.

सन २०२५-२६ ते २०२९-३० या पाच वर्षांसाठी बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा करारनामा करण्यास तसेच त्यासाठी होणाऱ्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. उपसूचनेसह हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे.

महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नियमानुसार प्रथा बोनस व सानुग्रह अनुदानाचा लाभ दिला जातो. त्यानुसार ८.३३ टक्के प्रथा बोनसासोबत पूर्वी २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद होती. मात्र, स्थायी समितीने उपसूचना मंजूर करून ही रक्कम २५ हजारांवरून ३० हजार रुपये करण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या कुटुंबीयांचीही यंदाची दिवाळी अधिक आनंदात साजरी होणार आहे. अंतिम मंजुरीनंतर वाढीव सानुग्रह अनुदानाचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार! दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार!
दापोडी परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती...
आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम
मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!
कृष्णानगर स्पाईन रस्त्याच्या सेवा रस्त्यावरील बेकायदेशीर अवजड
नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा
वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार