गुन्हेगारी प्रवृत्तींचे कृत्य खपवून घेणार नाही; सुनेत्रा पवार यांचा पोलिसांना इशारा

कोयता गँग, ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करा; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या कामकाजाचा आढावा

गुन्हेगारी प्रवृत्तींचे कृत्य खपवून घेणार नाही; सुनेत्रा पवार यांचा पोलिसांना इशारा

पुणे : पुणे शहराची शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखणे ही पोलीस दलाची प्राथमिक जबाबदारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गुन्हेगारी प्रवृत्तींचे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पोलिसांना दिला.

पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या कामकाजाचा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपकुमार गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

शिवाजीनगर न्यायालय परिसरात झालेली हल्ल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलिसांनी केवळ घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर द्यावा. गुन्हेगारी हालचालींची गोपनीय माहिती संकलित करणारी यंत्रणा अधिक सक्षम आणि सक्रिय करावी, असे निर्देश पवार यांनी दिले.

अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांसह कोयता गँग आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करावी. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण झाला पाहिजे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी पोलीस गस्त आणि सुरक्षा व्यवस्था वाढवावी. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवून नियमित तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पोलीस विभागाने कार्यक्षमता आणि कामगिरी अधिक उंचावण्याची गरज आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. मात्र, या घटनेतून धडा घेऊन पोलीस दलाने कामगिरीत सुधारणा करावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे शहराची शांतता, सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क, सक्षम आणि परिणामकारकपणे काम करावे. आगामी काळात पोलीस दलाचा धाक आणि दबदबा नागरिकांना दिसून येईल, असेही पवार म्हणाल्या. या कामात नागरिकांनीही पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट
पुणे : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी बुधवार पेठ...
लोहगावच्या आकाशात तिरंग्याची शान; हवाई कसरतींनी पुणेकर मंत्रमुग्ध
एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास वाहनांच्या कामांवर निर्बंध
सिटी प्राईड इमारतीतील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त
शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आता मालकी हक्क; फक्त ५ टक्के अधिमूल्य
दुष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; एकनाथ शिंदे यांची ग्वाही
गुन्हेगारी प्रवृत्तींचे कृत्य खपवून घेणार नाही; सुनेत्रा पवार यांचा पोलिसांना इशारा