उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर
महापालिका मुख्यालयात बैठक घेणार
पिंपरी : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज, सोमवार (दि.२३ नोव्हेंबर) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. अधिकृत कार्यक्रमानुसार, सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात आगमन होणार आहे.
उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या या महापालिका मुख्यालयातील भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीदरम्यान महापालिका प्रशासनाशी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्याकडे महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List