भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे निखिल बोऱ्हाडे यांचे नागरिकांना आवाहन

भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या जयघोषात ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर एमएसएफ (MSF) जवानांनी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

भोसरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या  विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या जयघोषात ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर एमएसएफ (MSF) जवानांनी सादर केलेले शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

WhatsApp Image 2026-08-15 at 2.14.25 PM
याप्रसंगी क क्षेत्रीय अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधताना देशाच्या प्रगतीसाठी स्वातंत्र्य मूल्यांची जपणूक आणि मूलभूत कर्तव्यांच्या पालनावर विशेष भर देण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण झाली असली, तरी दैनंदिन जीवनातील मूलभूत नागरी कर्तव्ये पार पाडणे हीच खरी देशसेवा असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, रस्त्यावर कुठेही कचरा न टाकता त्याचे योग्य वर्गीकरण करून तो कचरा गाडीतच देणे, अशा छोट्या-छोट्या नियमांचे नागरिकांनी पालन केले पाहिजे, असे  आवाहन यावेळी त्यांनी आले.

WhatsApp Image 2026-08-15 at 2.14.25 PM (1)

तसेच, प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी अधिकारी व नागरिकांमधील संवाद महत्त्वाचा असून, सर्व अधिकाऱ्यांनी नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांची कामे मोकळ्या मनाने व योग्य रीतीने वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Image 2026-08-16 at 12.57.37 PM

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित...
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; 
‘नाशिक फाटा–खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर’साठी भूसंपादन ‘मार्किंग’ सुरू! 
पुणे-पिंपरीत एफडीएची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या सहा हॉटेल-बेकरींचे परवाने निलंबित