हिंजवडी, माण, मारुंजीतील विकासकामांना गती द्या!

रस्त्यांच्या ४५० कोटींच्या प्रस्तावित कामांच्या निविदा २५ नोव्हेंबरपर्यंत काढा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

हिंजवडी, माण, मारुंजीतील विकासकामांना गती द्या!

पुणे : हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापनाची कामे गतीने पूर्ण करावीत. विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिला.

जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी रस्ते विकासासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांचे तांत्रिक सादरीकरण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.

या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि तांत्रिक बाबी नोव्हेंबरअखेरपर्यंत अंतिम कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रस्त्यांच्या कामांच्या निविदा २५ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करून २० डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.

माण, मारुंजी आणि हिंजवडी परिसरातील रस्त्यांचे आरेखन तसेच भूसंपादनासंदर्भातील अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वर्तुळाकार मार्गाच्या कामाला प्राधान्य देऊन मोजणी प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले.

पाणी व्यवस्थापनावर भर

परिसरातील गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा तसेच सांडपाणी प्रक्रियेच्या प्रश्नांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करणे आणि पाण्याच्या स्रोतांचे योग्य नियोजन करण्याबाबत संबंधित यंत्रणांनी अहवाल सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले. मुळशी धरण आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यावरही जिल्हाधिकाऱ्यांनी भर दिला.

कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

परिसरात उघड्यावर कचरा जाळणे तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाले आणि नदीपात्रात सोडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून दोषींना नोटिसा बजावाव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर आवश्यकतेनुसार कारवाई करावी. कचरा टाकण्याची ठिकाणे आणि प्रदूषणाची संभाव्य ठिकाणे निश्चित करून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जुन्नरच्या कोल्हेवाडीत १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा आधार! जुन्नरच्या कोल्हेवाडीत १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा आधार!
पिंपरी-चिंचवड : भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे १५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक...
हिंजवडी, माण, मारुंजीतील विकासकामांना गती द्या!
वाडा गावातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचली महिनाभराची अन्नधान्य मदत
कासारवाडीचा जलतरण तलाव पाच महिन्यांनंतर सुरू; मात्र सुविधांचा अभाव कायम!
आहुपेत गरजू कुटुंबांना मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तूंच्या २०० किटचे वाटप
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर
Dadasaheb Phalke Awards 2026 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पटकावले तब्बल ६ पुरस्कार!