बेकायदा होर्डिंग्जवरील कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

‘पुणेरी’ पद्धतीचे केले अभिनंदन; माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले तर पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव घ्या, अशी मिश्किल टिप्पणी

बेकायदा होर्डिंग्जवरील कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक

पुणे : शहरातील अतिक्रमण आणि बेकायदा होर्डिंग्जविरोधात पुणे महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा नागरिकांच्या वापरासाठी मोकळ्या असणे आवश्यक आहे. त्यामुळे बेकायदा होर्डिंग्जविरोधात नियमित आणि सातत्याने कारवाई झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी रस्ते आणि पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे असणे गरजेचे आहे. नियम केवळ सरकारी कागदपत्रांमध्ये लिहिण्यासाठी नसतात, तर त्यांचे पालन होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करणे हा नियमांचा मुख्य उद्देश असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

बेकायदा होर्डिंग्जची समस्या केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून देशातील अनेक शहरांमध्ये दिसून येते. त्यामुळे अशा होर्डिंग्जवर सातत्याने कारवाई करणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने यासाठी स्वीकारलेली अभिनव आणि खास ‘पुणेरी’ पद्धत कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “पुणे प्रशासनाला मी एवढेच सांगेन की, उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा!” त्यांच्या या विधानाची विशेष चर्चा होत आहे.

येत्या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. या काळात नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नागपूर महापालिका आणि प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शहराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक जागांवर बेकायदा होर्डिंग्ज लागणार नाहीत, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नेते असोत किंवा कार्यकर्ते, त्यांनी कायम जनतेमध्ये दिसले पाहिजे; बेकायदा होर्डिंग्जवर नाही, असा संदेशही फडणवीस यांनी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार
पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढती लोकसंख्या आणि जलस्रोतांवरील ताण लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बांधकाम...
बेकायदा होर्डिंग्जवरील कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक
इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमुळे २९ नोव्हेंबरला शहरातील १५ मार्ग बंद
अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण
राज्यात ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू होणार; प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र ओळख
राज्याच्या आरोग्य विभागाला मिळणार ३५० अद्ययावत रुग्णवाहिका