मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!

हलाखीच्या परिस्थितीवर मात करत दमाममध्ये ‘ज्युनियर डिझायनर’ पदावर झेप; कंपनीकडून परदेशातील सर्व खर्चाची जबाबदारी

मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याने आपल्या कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन 2021-23 सत्रातील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ याची सौदी अरेबियातील दमाम येथे ज्युनियर डिझायनर म्हणून निवड झाली आहे.

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) प्रशिक्षणार्थी असिफ अल्लाउद्दीन मुलानी याने आपल्या कौशल्याच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन 2021-23 सत्रातील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडचा प्रशिक्षणार्थी असिफ याची सौदी अरेबियातील दमाम येथे ज्युनियर डिझायनर म्हणून निवड झाली आहे.

असिफने ITIच्या प्रथम व द्वितीय अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. या गुणवत्तेच्या आधारावर त्याला इनप्रो कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारीची संधी मिळाली. त्यानंतर त्याची याच कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून निवड झाली.

दरम्यान, उत्कृष्ट कामकाज, तांत्रिक कौशल्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर असिफने कंपनीचा विश्वास संपादन केला. त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केल्यानंतर इनप्रो कंपनीने सौदी अरेबियातील आपल्या मुख्य कंपनीमध्ये असिफची ज्युनियर डिझायनर म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे, या नियुक्तीसाठी आवश्यक असलेला सर्व खर्च कंपनीकडून करण्यात येणार आहे.

हलाखीच्या परिस्थितीतून यशाची भरारी

असिफच्या यशाला आणखी विशेष महत्त्व आहे. आई-वडिलांचे छत्र नसतानाही आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्याने संघर्ष करत हे उत्तुंग यश संपादन केले आहे. त्याचा संघर्ष आणि यशाचा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

असिफच्या यशाने प्रेरित होऊन त्याच्या बहिणीनेही मोरवाडी ITIमध्ये चालू शैक्षणिक वर्षात ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ट्रेडला प्रवेश घेतला आहे. त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या यशातून कुटुंबातील इतर सदस्यांनाही करिअरची नवी दिशा मिळत असल्याचे दिसून येते.

परदेशी शिक्षण व रोजगाराचा उपक्रम

मोरवाडी ITIकडून अशा विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्यात येते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडविण्याच्या दृष्टीने संस्थेकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली विभागांतर्गत ‘परदेशी शिक्षण व रोजगार’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

असिफने मिळवलेल्या यशाबद्दल तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी प्राचार्य शशिकांत पाटील, गटनिदेशक ओव्हाळ आर. एस., निदेशक काळोखे व्ही. व्ही. तसेच सर्व गटनिदेशक व निदेशकांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार! दापोडीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाती उर्फ माई काटे यांचा पुढाकार!
दापोडी परिसराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास व्हावा, नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती...
आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती
विद्यार्थी एक दिवसाचे प्राचार्या, उपप्राचार्या आणि प्राध्यापक; शिक्षक दिनाचा अनोखा उपक्रम
मोरवाडी ITIच्या असिफची सौदीत निवड!
कृष्णानगर स्पाईन रस्त्याच्या सेवा रस्त्यावरील बेकायदेशीर अवजड
नात्यांपलीकडे जाऊन जपला मायेचा धागा
वैफल्यग्रस्तांच्या मनाला धीर देणारा पदपथावरील आधार