डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव : आमदार शंकर जगताप

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लिंबाळे यांची १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव : आमदार शंकर जगताप

पिंपरी : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा साहित्यविश्वात गौरव झाला आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे रहिवासी असलेल्या डॉ. लिंबाळे यांच्या या निवडीबद्दल आमदार शंकर जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सन्मान केला आणि त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. लिंबाळे हे पिंपरी-चिंचवडचे भूमिपुत्र असल्याने त्यांच्या निवडीचा आनंद संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. मराठी साहित्यविश्वात राष्ट्रीय स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या साहित्यिकाचा शतकमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गौरव होणे, हा पिंपरी-चिंचवडच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक ओळखीचा सन्मान असल्याची भावना यावेळी आमदार शंकर जगताप यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

‘अक्करमाशी’ या आत्मकथनातून आणि ‘सनातन’सारख्या साहित्यकृतीतून डॉ. लिंबाळे यांनी उपेक्षित समाजाचे वास्तव, जातिभेद आणि सामाजिक विषमता प्रभावीपणे मांडली आहे. दलित साहित्याला व्यापक ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. असेही जगताप यावेळी म्हणाले.

भेटीदरम्यान आमदार जगताप यांनी डॉ. लिंबाळे यांच्याशी साहित्य, सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्यविश्वातील विविध विषयांवर संवाद साधला व त्यांचे मार्गदर्शन घेतले. आजच्या या निवडी मधून  शहरातील नवोदित लेखक, साहित्यिक आणि युवा पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून जगताप यांनी डॉ. लिंबाळे यांना पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव : आमदार शंकर जगताप डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव : आमदार शंकर जगताप
पिंपरी : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराचा साहित्यविश्वात...
शरणकुमार लिंबाळे यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड अभिमानास्पद!
मुंबई पुस्तक महोत्सव ठरणार संवेदना आणि मानवतेचा उत्सव!
कचरा व्यवस्थापनात महापालिका अपयशी; सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर नाराजी
जुन्नरच्या कोल्हेवाडीत १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा आधार!
हिंजवडी, माण, मारुंजीतील विकासकामांना गती द्या!
वाडा गावातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचली महिनाभराची अन्नधान्य मदत