अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

पदपथ अतिक्रमणमुक्त करून सलग पादचारी मार्गिका तयार करण्याच्या सूचना; नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याचेही निर्देश

अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी. पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी सलग मार्गिका तयार कराव्यात. कारवाईला विरोध करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत. अतिक्रमण कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी संबंधित ठिकाणी स्वतः भेट देऊन पाहणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका प्रशासनाच्या आढावा बैठकीत आयुक्त सूर्यवंशी यांनी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, स्वच्छता, नाल्यांवरील अतिक्रमणे आणि पावसाळी उपाययोजनांचा आढावा घेतला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सीताराम बहुरे, राजेश आगळे, सहायक आयुक्त मुकेश कोळप यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

शहरातील अनधिकृत बांधकामे आणि दुकाने हटवून पदपथ नागरिकांसाठी मोकळे करावेत. पादचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता यावे, यासाठी पदपथांची सलग जोडणी कायम ठेवावी. अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून पाडकाम करावे. कारवाईदरम्यान विरोध करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

नाल्यांवरील अतिक्रमणे हटवा

शहरातील नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बांधकाम व्यावसायिकांनी नाल्यांवर अनधिकृतपणे उभारलेले कल्व्हर्ट संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच हटवावेत. गृहनिर्माण सोसायट्यांनी नाल्यांवर कल्व्हर्ट उभारले असल्यास ते हटविण्याची जबाबदारी संबंधित सोसायटीने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आरएमसी प्रकल्पांसाठी स्वतंत्र झोन

शहरात असलेल्या ६५ रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पचालकांनी नियम आणि निकषांचे पालन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पांसाठी स्वतंत्र झोन निश्चित करण्याची गरज असून, त्यासाठी योग्य जागा शोधून नियोजन करावे, अशा सूचनाही आयुक्त सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिल्या.

सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग नकोत

शहरातील सार्वजनिक ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. नागरिकांना स्वच्छ परिसर दिसेल, अशा पद्धतीने दृश्यमान स्वच्छता राखावी. तसेच बीआरटी मार्गालगत असलेल्या महापालिकेच्या वाहनतळ सुविधांचा योग्य वापर सुनिश्चित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

चिखली घरकुल परिसरातील पाणी साचण्यावर उपाय

चिखली घरकुल प्रकल्प परिसरात पावसाळ्यात पाणी साचून नुकसान होऊ नये, यासाठी नाला बांधणीचे काम आणि पर्यायी पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन करावे. या दोन्ही कामांना गती देऊन आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. शहरातील अन्य भागांमध्येही पावसामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण होणाऱ्या ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्तांनी दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी. पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी सलग मार्गिका तयार कराव्यात. कारवाईला...
सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण
राज्यात ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू होणार; प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र ओळख
राज्याच्या आरोग्य विभागाला मिळणार ३५० अद्ययावत रुग्णवाहिका
‘आकाश ही मर्यादा नाही, नव्या संधींचे प्रवेशद्वार’; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव : आमदार शंकर जगताप
शरणकुमार लिंबाळे यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड अभिमानास्पद!