आहुपेत गरजू कुटुंबांना मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तूंच्या २०० किटचे वाटप

‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ उपक्रम; नगरसेविका नम्रता लोंढे व योगेश लोंढे यांचा पुढाकार

आहुपेत गरजू कुटुंबांना मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तूंच्या २०० किटचे वाटप

पिंपरी : आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावात गरजू कुटुंबांना किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या २०० मदत किटचे वाटप करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमांतर्गत नगरसेविका सौ. नम्रता लोंढे आणि योगेश लोंढे यांनी या वाटपासाठी पुढाकार घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवाकार्याच्या प्रेरणेतून आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘एक सहकारी, एक गाव, प्रत्येक कुटुंबाला आधार’ या संकल्पनेतून ५१ आदिवासी गावांतील गरजू कुटुंबांना किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्यात आली. दैनंदिन गरजा भागवताना अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आहुपे येथील वाटपासाठी जालिंदर कातकडे, कौशल पब्बुन आणि विजय बिरादार यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. आहुपेचे सरपंच रमेश लोहकरे यांनी गावातील गरजू कुटुंबांना मदत दिल्याबद्दल आमदार महेश लांडगे यांचे आभार मानले.

“आहुपेतील गरजू कुटुंबांना किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत वेळेवर मिळावी, या हेतूने आम्ही २०० किटचे वाटप केले. आमदार महेशदादा लांडगे यांच्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमात आम्हाला खारीचा वाटा उचलता आला, याचे समाधान आहे. गावातील कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे ही मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवता आली.”

– नम्रता लोंढे, नगरसेविका, भाजपा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जुन्नरच्या कोल्हेवाडीत १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा आधार! जुन्नरच्या कोल्हेवाडीत १५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा आधार!
पिंपरी-चिंचवड : भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे १५० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक...
हिंजवडी, माण, मारुंजीतील विकासकामांना गती द्या!
वाडा गावातील वाड्या-वस्त्यांवर पोहोचली महिनाभराची अन्नधान्य मदत
कासारवाडीचा जलतरण तलाव पाच महिन्यांनंतर सुरू; मात्र सुविधांचा अभाव कायम!
आहुपेत गरजू कुटुंबांना मदतीचा हात; जीवनावश्यक वस्तूंच्या २०० किटचे वाटप
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर
Dadasaheb Phalke Awards 2026 : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने पटकावले तब्बल ६ पुरस्कार!