नोकरी मागताच सरकार संतापले; कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला? बेरोजगार तरुणावर अजितदादा खेकसले
मला सरकारी नोकरी द्या, अशी मागणी करणाऱ्या तरुणावर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला?, बोलण्याची ही पद्धत नाही, असे म्हणत अजितदादा बेरोजगार तरुणावर खेकासले.
अजितदादा पत्रकारांशी संवाद साधत असताना एका तरुण दादा, मला गव्हर्नमेंट जॉब द्या, अशी मागणी करू लागला. त्याचा विषय क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी तिथे आमचे क्रीडामंत्री दत्ता भरणे आहेत. त्यांना तुम्ही जाऊन भेटा, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर त्या तरुणाने आपले गाऱहाणे चालूच ठेवल्याने अजितदादा संतापले. तुला हीच जागा आठवली का? असा सवाल त्यांनी केला.
z ‘सरकारी नोकरीची मागणी करणारा तो तरुण काही केल्या ऐकत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, मी तुझ्या विषयात माहिती घेईन, तू बोलतोय त्यात तथ्य आहे का हे बघेन. राज्य सरकारचं क्रीडाविषयक धोरणात तू बसत असशील तर शंभर टक्के तुझं काम होईल. तू सरकारच्या धोरणात बसत नसशील तर तुला तसं कळवण्यात येईल,’ असे सांगत त्याची समजूत काढली.
आपलं वाटोळं होतंय, इथं कुणाला झापायला आलेलो नाही!
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये वाढती वाहतूकोंंडी, नागरी समस्यांमुळे आपले वाटोळे होत आहे. यामुळेच आयटी पार्कमधील कंपन्या पुणे, महाराष्ट्रातून हैदराबाद, बंगळुरूला जात असल्याची कबुली अजित पवार यांनी दिली. ‘मी इथं कुणाला झापायला आलेलो नाही,’ असे सांगत, हिंजवडीतील प्रश्न सुटले पाहिजेत. विकासकामाच्या आड कोणी आल्यास, तो कोणीही असो, अजित पवार असला तरी सरकारी कामात अडथळा आणल्याचा 353 नुसार गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List