Hair Care – पावसाळ्यात केसांना किती प्रमाणात तेल लावायला हवे? वाचा
पावसाळ्याच्या दिवसात त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या झपाट्याने वाढतात. या ऋतूत चिकटपणा आणि ओलाव्यामुळे, केसगळती मोठ्या प्रमाणात सुरु होते. त्यामुळे केसामध्ये कोंडा, केस गळणे आणि खाज सुटणे या समस्यांना सुरुवात होते. या परिस्थितीत केसांची काळजी घेण्याकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. केसांची काळजी घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, केसांची मालिश करणे. परंतु पावसाळ्यात केसांना तेल लावताना मात्र जरा जपूनच, जाणून घेऊया पावसाळ्यात केसांना किती प्रमाणात तेल लावावे.
पावसाळ्यात केसांना तेल लावताना काय काळजी घ्यायला हवी?
केसांना तेल लावणे हे केसांच्या पोषणासाठी खूप गरजेचे आहे.
केसांना तेल लावणे हे ओलावा आणि संरक्षणासाठी फायदेशीर ठरू शकते. परंतु पावसाळ्यामध्ये केसांना अधिक प्रमाणात तेल लावल्यामुळे, केसांमध्ये चिकटपणा येतो. त्यामुळे केसांच्या मुळाशी ओलावा आणि घाण तशीच साठुन राहते. म्हणून पावसाळ्यामध्ये दररोज केसांना तेल लावु नये.
विशेषतः पावसाळ्यात केसांना रोज तेल लावणे हे टाळायलाच हवे. पावसाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी, आठवड्यातून 1-2 वेळा तेल लावणे उत्तम. तेल लावल्यानंतर वेळेवर केस धुणेही तितकेच महत्वाचे आहे.
पावसाळ्यात तुमचे केस कोरडे ठेवा. यासाठी स्कार्फ, टोपी किंवा छत्री वापरून पावसापासून केसांचे संरक्षण करा.
पावसाळ्यात ओले झाल्यानंतर ओले केस बांधणे टाळा कारण त्यामुळे केस तुटू शकतात.
पावसाळ्यात रुंद दात असलेला कंगवा वापरा. यामुळे गोंधळलेले केस तुटण्यापासून बचाव होतो.
पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी स्टायलिंग कमी करा. जास्त उष्णतेमुळे केस कोरडे होऊ शकतात आणि त्यांचे नुकसान होऊ शकते.
पावसाळ्यात हेअर स्पा फायदेशीर ठरू शकतो. घरी उपलब्ध असलेल्या वस्तू वापरून तुम्ही हेअर स्पा करू शकता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List