Skin Care – चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी ‘हा’ फेसमास्क आहे सर्वात उत्तम, वाचा

Skin Care – चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी ‘हा’ फेसमास्क आहे सर्वात उत्तम, वाचा

बीटरूट हे केवळ आपल्या आरोग्यासाठी उत्तम नाही तर, आपल्या सौंदर्यासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. बीटामध्ये असलेले पोषक घटक त्वचा आणि केस निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करतात. चेहऱ्यावर बीटरूट अनेक प्रकारे आपण वापरू शकतो. बीटाचा फेस पॅक तयार करून नंतर तो चेहऱ्यावर लावणे चांगले. मुलतानी माती आणि बीटरूट मिसळून फेस पॅक बनवुन चेहऱ्यावर लावल्याने, त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

बीटरुट मुलतानी माती फेसमास्क कसा बनवाल?

– एक चमचा मुलतानी माती

– एक चमचा बीटरुट रस

– अर्धा चमचा लिंबाचा रस

– एक चमचा मध

– एक चमचा तांदळाचे पीठ

– एक चमचा दही

– चार चमचे गुलाब पाणी

Skin Care – चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी फक्त 2 रुपये पुरेसे आहेत, वाचा

फेस पॅक कसा बनवायचा

प्रथम एका भांड्यात मुलतानी माती घ्या. नंतर त्यात गुलाब पाणी घाला आणि चांगले मिसळा. मुलतानी माती बीटरुट आणि लिंबाच्या रसात भिजवा. चांगले मिसळल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ आणि मध घाला. चांगले मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट तयार करा.

फेसपॅक कसा लावायचा

फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर या मास्कचा पातळ थर गोलाकार हालचालीत लावा आणि तो संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर पसरवा. 15 मिनिटे मास्क तसाच राहू द्या आणि नंतर चेहरा पूर्णपणे धुवा. तुमची त्वचा कोरडी असेल तर हा मास्क धुतल्यानंतर चेहऱ्यावर हलका मॉइश्चरायझर लावा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;