Mumbai News – मुंबईत पावसाची मुसळधार, विमानसेवेला फटका; इंडिगो, स्पाइसजेटकडून अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai News – मुंबईत पावसाची मुसळधार, विमानसेवेला फटका; इंडिगो, स्पाइसजेटकडून अ‍ॅडव्हायजरी जारी

आठवड्याची सुरवात मुसळधार पावसाने झाली असून यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सर्वत्र वाहतूक कोंडी झाली असून लोकल आणि विमानसेवेलाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे विमानाच्या उड्डाणांना विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडिगो आणि स्पाइसजेटकडून अ‍ॅडव्हायजरी जारी केले आहे. विमान कंपन्यांनी प्रवाशांना त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा आणि गैरसोय टाळण्यासाठी विमानतळावर लवकर पोहोचण्याचा सल्ला दिला.

स्पाइसजेटने X वर निवेदन जारी केले. मुंबईतील खराब हवामानामुळे विमानाचे सर्व निर्गमन/आगमन आणि परिणामी त्यांच्या उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, असे स्पाइसजेटने आपल्या निवेदनात म्हटले आहे. प्रवाशांना spicejet.com द्वारे त्यांच्या विमानाच्या स्थितीची तपासणी करण्याची विनंती एअरलाइनने केली आहे.

इंडिगोने देखील अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या अनेक मार्गांवर वाहतूक मंदावलेली दिसून येत आहे. जर तुम्ही आज विमान प्रवास करत असाल तर कृपया आगाऊ नियोजन करा, थोडे लवकर निघा आणि बाहेर पडण्यापूर्वी आमच्या अ‍ॅप किंवा वेबसाइटवर तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासा, असा सल्ला इंडिगोने आपल्या अ‍ॅडव्हायजरीत दिला आहे.

मुंबई विमानतळाकडून एक्सवर अ‍ॅडव्हायजरी जारी करत फ्लाईट चुकू नये म्हणून वेळेआधीच विमानतळावर पोहोचण्याचे प्रवाशांना आवाहन केले आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार तासांत मुंबई आणि मुंबई उपनगरातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;