Shahi Paneer Recipe – रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी शाही पनीर बनवा घरच्या घरी, पाहुणेही विचारतील याची रेसिपी
शाही पनीर ही ढाब्यात किंवा रेस्टॉरंटमध्ये सर्वात जास्त ऑर्डर केलेल्या पनीर भाज्यांपैकी एक आहे. अनेकजण शाही पनीर घरी बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतु रॅस्टाॅरंटसारखी चव मात्र येत नाही. खूप मेहनत करूनही भाजी तुमच्या इच्छेनुसार तयार झाली नाही, तर सर्व मेहनत व्यर्थ जाते. तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर घरी बनवायचे असेल, तर येथे दिलेली रेसिपी एकदा ट्राय करा. जाणून घ्या, रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर कसे बनवायचे.
शाही पनीर रेसिपी
300 – ग्रॅम पनीर
1- इंच आले
10-12 – लसूण पाकळ्या
2-3 – मध्यम आकाराचे कांदे
6-7 मध्यम आकाराचे टोमॅटो
कोथिंबीर
1/4 कप काजू
3-4 हिरव्या मिरच्या
2 चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर
1 चमचा हळद पावडर
1 चमचा जिरे पावडर
1 चमचा गरम मसाला
2 चमचे ताजी क्रीम
2 चमचे कसुरी मेथी
1 चमचा साखर
चवीनुसार मीठ
3 चमचे तेल
2-3 चमचे बटर
कृती
शाही पनीर बनवण्यासाठी, एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करावे.
नंतर त्यात आले, लसूण पाकळ्या, चिरलेला कांदा, काजू, हिरव्या मिरच्या, कोथिंबीरीचे देठ, बारीक चिरलेले टोमॅटो, कोथिंबीर, एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर आणि कमीत कमी पाणी घाला.
सर्वकाही 15 मिनिटे शिजवा.
15 मिनिटांनी टोमॅटो मॅश झाले की नाही ते बघावे. त्यानंतर गॅस बंद करा.
थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक करा.
आता ही ग्रेव्ही चांगली गाळून घ्या. नंतर एका पॅनमध्ये बटर घाला आणि मिक्स केल्यानंतर तेल घाला.
आता काश्मिरी लाल तिखट, हळद, जिरे पावडर आणि ग्रेव्ही घाला.
चांगले परतून घ्या आणि नंतर त्यात साखर आणि मीठ घाला.
ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत चांगली शिजवा. घट्ट झाल्यावर त्यात चौकोनी तुकडे केलेले पनीर घाला.
पनीर घातल्यानंतर, कसुरी मेथी, गरम मसाला आणि ताजी क्रीम घाला. मिक्स करा आणि सर्व्ह करा.
Jeera Rice Recipe – ढाबा स्टाईल फडपडीत जीरा राईस बनवा आता घरच्या घरी..
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List