Navi Mumbai – हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने; स्टेशनवर गर्दी, प्रवाशांचे हाल

Navi Mumbai – हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक उशिराने; स्टेशनवर गर्दी, प्रवाशांचे हाल

>> गणेश पुराणिक

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईकरांना रेल्वे वाहतुकीच्या खोळंब्यामुळे मोठा फटका बसला आहे. पनवेल – सीएसएमटी मार्गावरील अप-डाऊन दिशेने सुरू असलेली वाहतूक उशिराने सुरू आहे. यामुळे रेल्वे स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली असून चाकरमान्यांना आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास उशीर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरूळ स्थानकाजवळ रविवारी सायंकाळी साडे चारच्या सुमारास रेल्वेचे एक मशीन घसरले होते. त्याचे काम सोमवारी सकाळपर्यंत सुरू होते. त्यामुळे सायंकाळी घरी निघालेल्या नागरिकांना त्रास झाला. नागरिकांनी रेल्वे रुळावरून चालत जावून स्थानकं गाठली. दरम्यान,  या काळात पनवेल-नेरूळ-वाशी अशा विशेष बस चालवण्यात आल्या होत्या.

दरम्यान, थोड्या वेळापूर्वी मानखुर्द रेल्वे स्टेशनवर लोकल सुरू झाल्याची उद्घोषणा होत आहे. पनवेल येथून 6 वाजून 2 मिनिटांनी एक लोकल सीएसएमटीच्या दिशेने मार्गस्थ झाली. तत्पूर्वी वाशी येथून वडाळा स्थानकापर्यंत जाणारी लोकल सोडण्यात आली. मानखुर्दला 6 वाजून 13 मिनिटांनी येणारी ही लोकल साधारण अर्धा तास उशिराने आली. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती.

लोकलसेवेचा बोजवारा उडाल्याने सकाळच्या सुमारास कार्यालयीन कामकाजाला निघालेली चाकरमानी विविध स्थानकांवर अडकली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लेटमार्क लागणार म्हणून प्रवाशांना मनस्ताप होत आहे. अनेकांनी मिळेल ते साधन एसटी, बेस्ट, टॅक्सी, रिक्षा पकडून इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला.

हार्बरच्या प्रवाशांना ‘ओव्हरहेडेक’! स्टंटबाज रुळावर कोसळला; दुरुस्ती मशीन मार्गात अडकली, बेलापूर, सीवूड, नेरुळ रेल्वे स्थानकांत प्रवाशांची लटपंटी

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना अग्रमानांकन; राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
विश्वजित थविल, शरयू रांजणे, ऋत्व सजवान, शौर्या मडवी यांना योनेक्स सनराईज राज्यस्तरीय 15 व 17 वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकन...
सतेज, राजमाता जिजाऊ संघांना विजेतेपद
बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या