ढगाळ वातावरणामुळे उसावर पायरीला, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव; उत्पन्न घटणार

ढगाळ वातावरणामुळे उसावर पायरीला, पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव; उत्पन्न घटणार

अवकाळी पाऊस, पावसाने दिलेला ताण आणि तापमानात अचानक वाढ, ढगाळ वातावरणामुळे उसावर पायरीला आणि पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन उसाचे उत्पन्न घटणार असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पैठण येथील जायकवाडी धरण गतवर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने अंबड, घनसावंगी तालुक्यांत उसाच्या लागवडीचे प्रमाण वाढले. ऊस हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. साखर कारखान्यांकडून चांगला दर मिळत असल्याने हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल काही दिवसांत वाढला. उसाची लावण केल्यानंतर पीक वाढेपर्यंत त्याला पाणी देण्याखेरीज जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळेही हे पीक शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. आता तेच पीक रोगामुळे धोक्यात आले आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार वाहुणी अवकाळी पावसाने जोर धरला जून अर्ध्या महिन्यापर्यंत पावसाचा जोर राहिला. त्यानंतर दीड महिना उलटला तरी रिमझिम पावसाशिवाय पाऊस पडला नाही. सतत ढगाळ आता रखरखते ऊन, गर्मी एकएकीच गायब झाल्याने ऊस पीक धोक्यात आले. उसाच्या पिकांला मोठ्या प्रमाणात रोगराईने ग्रासले आहे. पाऊस कमी, रोगराई जास्त वाढल्याने उसाचे उत्पन्न कमालीचे घटणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

पांढरी माशी पानांमधील रस शोषून घेतात, परिणामी पाने पिवळसर, कडा मुडपतात आणि शेवटी पाने सुकून जाते. या रोगाने प्रौढ आणि पिल्ले उसाच्या कोवळ्या पानातील रस शोषतात. तर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने पाने पिवळी पडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, यामुळे सतत पानामधून रस शोषण केल्यामुळे उसाची शेंड्याकडील पाने वाळून जात आहे व उसाचे डोळे फुटण्यास सुरुवात होऊ लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हा रोग हवेद्वारे पसरतो. मान्सूनपूर्व पडलेला वळीव पाऊस व पावसामुळे हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे हा रोग पानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो या रोगाची लागण सुरुवातील शेंड्यापासून येणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या कोवळ्या पानांवर दिसून येते. पानाच्या खालच्या भागात सुरुवातीला फिक्कट, हिरवट, पिवळसर, पांढरटपट्टे अथवा ठिपके दिसतात. रोगट पानांचा आकार बदलून त्यांची लांबी कमी होते. खोडाकडील भाग आखूड होऊन पाने एकमेकांत गुरफटली जातात. त्यामुळे ती पूर्णपणे उघडली जात नसल्याने उसाच्या पिकांला मोठा फटाका बसत असल्याने कृषी विभागाकडून तसेच कारखान्यांकडून यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे अशी मागणी शेतकरी करत आहेत. कृषी विभागाकडून तसेच कारखान्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली. जेणेकरून प्रादुर्भाव कमी होईल, असे दहयाळा येथील उस उत्पादक शेतकरी उमेश बर्वे यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान