तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना सोमवार सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान भोवळ आल्याने तातडीने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, स्टॅलिन यांना भोवळ आल्याने त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
अपोलो रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवा संचालक डॉ. अनिल बी.जी. यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना मॉर्निंग वॉक दरम्यान भोवळ आली. त्यांच्या आवश्यक चाचण्या करण्यासाठी त्यांना चेन्नईतील ग्रीम्स रोड येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.” रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्टॅलिन यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली तपासण्या सुरू आहेत आणि त्यांच्या प्रकृतीची पुढील माहिती चाचण्यांच्या अहवालानंतर मिळण्याची अपेक्षा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List