Thane News – रस्त्याने चालताना पाय घसरला अन् थेट उघड्या चेंबरमध्ये पडला, डोंबिवली एमआयडीसीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Thane News – रस्त्याने चालताना पाय घसरला अन् थेट उघड्या चेंबरमध्ये पडला, डोंबिवली एमआयडीसीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

रस्त्याने चालताना पाय घसरून पडल्याने उघड्या चेंबरमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण शीळ रोडवर घडली. या घटनेमुळे डोंबिवली एमआयडीसीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. बाबू धर्मा चव्हाण असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उघड्या चेंबर्सबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही एमआयडीसी त्याकडे डोळेझाक करत आहे.

कल्याण पूर्वेकडील शीळ रोडवर टाटा नाका गांधीनगर परिसरातून रविवारी चालत असताना बाबू चव्हाण यांचा पाय घसरला. यामुळे ते शेजारी उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. नागरिकांनी एक व्यक्ती चेंबरमध्ये पडल्याचे पाहताच तात्काळ धाव घेत चव्हाण यांना बाहेर काढले. चव्हाण यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नगारिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. याप्रकरणी एमआयडीसी प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या बंगाली भाषेवरील अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, भाषेच्या वादावरून ममता बॅनर्जी भाजपवर संतापल्या
तृणमूल काँग्रेसने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये ‘शहीद दिवस’ रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ते लोकसभा खासदार अभिषेक...
प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि राणा दग्गुबती यांना ईडीने बजावले समन्स; काय आहे प्रकरण?
Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा