वकिलांना नोटीस बजावणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन; सर्वोच्च न्यायालायने ईडीला पुन्हा फटकारले

वकिलांना नोटीस बजावणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन; सर्वोच्च न्यायालायने ईडीला पुन्हा फटकारले

जेष्ठ वकील अरविंद दातार आणि प्रताप वेणुगोपाल यांना ईडीने पाठवलेल्या समन्सच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने ईडीला पुन्हा फटकारले आहे. याआधी न्यायालयाने ईडीच्या होत असलेल्या राजकीय वापरावरून चांगलीच खरडपट्टी केली आहे. वकिलांना ईडीने पाठवलेल्या नोटीसवर सर्वोच्च न्यायालयाने नापसंती दर्शवली आहे. वकील आणि त्यांचा अशील यांच्यातील संवाद हा खासगी आणि गोपनीय असतो, तसेच तो विशेषाधिकार आहे. त्यावर अशा प्रकारे वकिलांना समन्स बजावणे योग्य आहे का? असा सवाल सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उपस्थित केला. तसेच वकिलांना समन्स बजावणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने याप्रकरणात सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. वकिलांमध्ये आणि त्यांच्या अशीलामधील संवाद गुप्त राखणे त्यांचा विषेशाधिकार आहे. असे असताना ईडीने संबंधित वकिलांना नोटीस कशी पाठवली असा प्रश्न न्यायालयाने विचारला. अशा प्रकारे समन्स देणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन असल्याचंही न्यायालयाने म्हटलंय. अ‍ॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी न्यायालयात सांगितले की, ईडीने जे केले ते चुकीचे होते.

ईडीने रिलिगेअर एन्टरप्रायझेसच्या माजी अध्यक्षा रश्मी सलुजा यांना 250 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ESOP (Employee Stock Option Plans) देण्याच्या प्रकरणात तपासादरम्यान हे समन्स बजावले होते. अरविंद दातार यांनी या ESOPs बाबत कायदेशीर मत दिले होते आणि प्रताप वेणुगोपाल हे अ‍ॅडव्होकेट-ऑन-रिकॉर्ड होते. देशभरातील बार असोसिएशन्सकडून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर ईडीने नोटिस मागे घेतली. तसेच सर्व फील्ड अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या वकिलांना नोटिस देण्यास मनाई करणारे परिपत्रक जारी केले. आता कोणत्याही विशेष परिस्थितीत नोटिस द्यायची असल्यास ED डायरेक्टरची मंजुरी आवश्यक ठरवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;