“भाजपनं विरोधकांसाठी प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावला, पण…”, संजय राऊतांचा मोठा दावा, CM सोबतचा फोटोही दाखवला

“भाजपनं विरोधकांसाठी प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावला, पण…”, संजय राऊतांचा मोठा दावा, CM सोबतचा फोटोही दाखवला

हनी ट्रॅपच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षाने हा मुद्दा विधिमंडळातही उपस्थित केला. मात्र ना हनी, ना ट्रॅप असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता याच प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचा विश्वासू कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. भाजपने प्रफुल्ल लोढाच्या माध्यमातून विरोधकांसाठी हनी ट्रॅप लावला होता, मात्र तो त्यांच्यावरच उलटला. त्यामुळे पोलीस पेन ड्राईव्ह, सीडीच्या शोधात छापेमारी करत आहेत, असा दावा राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केला. यावेळी राऊत यांनी प्रफुल्ल लोढा याचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटोही दाखवला.

देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे की त्यांचे चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत. तसेच आमचे जे खासदार फुटले किंबहुना फडणवीस, शहांनी फोडले. यामागे ईडी, सीबीआय आहेच, पण चार तरुण खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले. या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग त्यांनी भाजपमध्ये जाऊन शुद्धिकरण करून घेतले. महाराष्ट्रात नैतिकता उरलीच नाही. ना फडणवीस असले तरी अंतरंगात जे संस्कार असावे लागतात ते दिसत नाहीत, असा घणाघात राऊत यांनी केला.

राज्य रसातळाला जाताना दिसत आहे. काल लातूर येथील हाणामारीचे दृश्य सगळ्यांनी पाहिले. आमदार निवासची मारामारीही पाहिली. संजय शिरसाट यांच्या नोटांनी भरलेल्या बॅगाही पाहिल्या. हनी ट्रॅपचे प्रकरणही पाहिले आणि फडणवीस या सगळ्यांचे समर्थन करत भाषणे ठोकताहेत हे या राज्याचे दुर्दैव आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही. भ्रष्टाचार, व्याभिचार आणि मंत्रिमंडळातील गुंडागर्दीमुळे महाराष्ट्र आणि भाजपही बदनाम होत आहे. एक मंत्री रमी खेळताना दिसत असूनही त्याचे समर्थन सुरू आहे. हेच जर आमचे सरकार असताना झाले असते तर फडणवीस मंत्रालयाच्या पायऱ्यांवर उर बडवत बसले असते, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, प्रफुल्ल लोढा याच्यावरती हनी ट्रॅपच्या केसेस झालेल्या आहेत. त्याचा गिरीश महाजन सोबतचा फोटोही आहे. ज्यांनी त्याला वापरले तेच हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. यात सरकारमधील चार मंत्री आहेत, हे फडणवीस यांना माहिती आहे. म्हणून लोढाकडच्या पेन ड्राईव्ह, सीडी शोधण्यासाठी पोलीस जंगजंग पछाडत आहेत. प्रफुल्ल लोढा याच्या माध्यमातून भाजप अनेक महत्त्वाच्या लोकांना पकडत होते. याच प्रफुल्ल पटेल याचा मुख्यमंत्र्यांबरोबचा सत्कार स्वीकारतानाचा फोटो आहे. हा भाजपचा हस्तक असून त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वत:च्या लोकांवरही हनी ट्रॅप लावले. पण हे स्वत:वर उलटल्याने धावाधाव सुरू झाली.

राज्यातील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकलेले, त्यातील दोन भाजपचे आहेत! संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

दरम्यान, लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीवरही राऊत यांनी भाष्य केले. महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार नसून गुंडांची टोळी आहे. राज्यात अराजक निर्माण झालेले आहे. फडणवीस फक्त बोलतात हे करेन, ते करेन, पण त्यांच्या राज्यात काय चालले आहे. इतका हतबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही. आधीचे सरकार घटनाबाह्य होते आणि आताचे अनैतिक, व्याभिचारी सरकार आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला. राज्यात रोज इतके अनैतिक कृत्य घडत आहेत, त्यांच्या सरकारमध्ये मंत्री अनैतिक कृत्य करत आहेत, पण फडणवीस काही करू शकत नाहीत, अशी टीकाही राऊत यांनी केली.

कोकाटेंवरून लातुरात छावा आणि दादा गटात हाणामारी, तटकरेंवर पत्ते फेकले

काल खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या राज्य प्रमुखांवर हल्ला झाला. राष्ट्रवादीच्या राज्य प्रमुखांनी तो हल्ला केला. मुंबईमधील गुंड टोळ्या एकेकाळी अशा प्रकारच्या मारामाऱ्या करायचे. आमदार निवासात मारामाऱ्या होत आहेत. हनी ट्रॅपची प्रकरणं सुरू आहेत. मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जात आहेत. कुठे गेल्या भाजपच्या त्या फडफडणाऱ्या महिला नेत्या? असा सवालही राऊत यांनी केला.

गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा आरोप, एकनाथ खडसे यांच्या दाव्याने खळबळ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की… Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत....
उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचा राजीनामा, प्रकृती अस्वास्थ्याचे दिले कारण
गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
Ratnagiri News – चाकरमान्यांना बाप्पा पावला! 23 ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणार रो-रो कार सेवा
महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास तातडीने सुरू न झाल्यास, महाराष्ट्र बंद करू; जरांगे पाटील यांचा इशारा
टेकऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानाचे उड्डाण रद्द
माणिकराव कोकाटे यांचं वर्तन चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीस यांचं विधान