माता न तू वैरिणी! पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले
माणुसकीला काळिमा फासणारी घटना कांदिवली परिसरात घडली. मुलीच्या आईसह सावत्र पित्याने तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांसह रिक्षाचालकाला अटक केली. पीडित मुलीची रवानगी बालगृहात केली.
पीडित मुलगी ही कांदिवली येथे राहते. तिच्या आईने दुसरे लग्न केले आहे. एक दिवसापूर्वी ती मुलगी काही न सांगता घरातून निघून गेली. रात्री ती घरी न आल्याने तिचा शोध घेण्यात आला. ती मिळून न आल्याने तिच्या आईने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्या मुलीची माहिती काढली. त्यानंतर त्या मुलीला पोलिसांनी नालासोपारा येथून ताब्यात घेतले. तेव्हा तिने घरी सावत्र पिता तिच्यासोबत अत्याचार करायचा, त्यानंतर तिला दोघांनी वेश्या व्यवसायात ढकलल्याची माहिती दिली. त्यामुळे ती घरातून पळाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List