लातूरमध्ये मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला, कृषिमंत्र्यांवर कारवाई कधी? रोहित पवार यांचा सवाल
रविवारी लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सगण्यात आलं आहे. यातच मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला, मात्र विधानपरिषदेत मोबाईलवर रमी खेळतानारे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर करवून कधी होणार? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.
X वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “लातूर येथे मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला असला तरी ज्या पत्त्यांच्या खेळामुळे हा गोंधळ झाला आहे, तो खेळ खेळणाऱ्या मंत्र्यांवर आधी कारवाई होणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहत आहे, राज्यकर्ते लोकभावनेचा आदर राखतील, ही अपेक्षा.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List