ना पकडले, ना मारले; पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी गेले कुठे? विरोधकांनी मोदी सरकारला घेरले, संसदेत गोंधळ

ना पकडले, ना मारले; पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी गेले कुठे? विरोधकांनी मोदी सरकारला घेरले, संसदेत गोंधळ

 

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी विरोधकांनी पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, हिंदुस्थान पाकिस्तान युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे आणि अहमदाबाद विमान दुर्घटना या मुद्द्यावरून केंद्र सरकारला कोंडीत पकडले. पहलगाम हल्ल्याला 3 महिने होत आले तरीही अद्याप दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलेले नाही, असे म्हणत काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत मोदी सरकारवर हल्ला चढवला. यानंतर एकच गदारोळ सुरू झाला आणि राज्यसभेचे कामकाज सभापती जगदीप धनखड यांनी 12 वाजेपर्यंत तहकूब केले.

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी आपण 267 अंतर्गत चर्चा करण्याची नोटीस दिल्याचेही म्हटले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ला 22 एप्रिल रोजी झाला. आतापर्यंत दहशतवादी पकडण्यात आलेले नाही किंवा त्यांचा खात्माही करण्यात आलेला नाही. जम्मू काश्मिरच्या नायब राज्यपालांनी हा हल्ला गुप्तचर विभागाचे अपयश असल्याची कबुली दिली आहे. सरकारने विरोधकांना याबाबत अवगत करावे, अशी मागणी केली

डोनाल्ड ट्रम्प यांनी 24 वेळा सांगितले की, माझ्या मध्यस्थी नंतर हिंदुस्थान पाकिस्तान युद्ध थांबले. हे देशासाठी अपमानजनक आहे. सरकारने या सर्व प्रश्नांची उत्तरे विरोधकांना द्यायला हवीत, असा हल्लाबोल खरगे यांनी केला. यानंतर जेपी नड्डा यांनी आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले. तसेच स्वातंत्र्यानंतर असा ऑपरेशन सिंदूर सारखी कारवाई कधी झाली नाही असेही म्हटले.

दरम्यान, लोकसभेमध्येही याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याने विरोधकांनी घोषणाबाजीही केली. त्याआधी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करू असे म्हटले होते. मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही आणि लोकसभेत गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;