Pune News – आषाढी वारीनंतर चंद्रभागा वाळवंट परिसरात स्वच्छता मोहिम

Pune News – आषाढी वारीनंतर चंद्रभागा वाळवंट परिसरात स्वच्छता मोहिम

आषाढी यात्रा मुख्य सोहळा 06 जुलै 2025 रोजी संपन्न झाला. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूर शहरात लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. यात्रा कालावधीत चंद्रभागा वाळवंट परिसरातही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. येणाऱ्या भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ असावा यासाठी पंढरपूर शहर पोलीस अधिकारी -कर्मचारी व आर्ट ऑफ लिव्हिंगचे महिला व पुरुष साधक तसेच नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्याकडून चंद्रभागा वाळवंटपरिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

यात्रा कालावधीत वाळवंट परिसरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदर परिसरात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी याकरिता जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 20 जुलै 2025 रोजी वाळवंट परिसरात आर्ट ऑफ लिव्हींग धाराशिव संस्थेचे नंदु भैय्या तांबडे तसेच पुरुष व महिला साधक त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित येऊन वाळवंट परिसरातील मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून स्वच्छता मोहिम राबविली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;