Patanjali: लठ्ठपणा आणि बारीकपणावर उपाय सापडला, बाबारामदेव म्हणाले की…
भारतात आयुर्वेदानुसार उपचार वैदिक काळापासून सुरु आहे. लोक पहिल्यापासून आरोग्याच्या समस्यांवर जडी-बुटींचा वापर करायचे.परंतू आता काळानुसार इंग्रजी औषधांवर अवलंबून आहेत. पतंजलीने या बाबत मैलाचा दगड सिद्ध होत आहे. देशभरात याचे प्रोडक्ट वापरले जात आहेत. लोक आयुर्वेदिक औषधांपासून ते जेवणातही पतंजलीचे प्रोडक्ट्स खरेदी करत आहेत. या संस्थेचे संस्थापक बाबा रामदेव हे आरोग्यदायी जीवनासाठी टिप्स देखील देत असतात. लठ्ठपणा आजच्या काळात खूपच चिंताजनक समस्या आहे. कारण चुकीच्या आहारशैलीने वेगाने वजन वाढत आहे.आणि लोक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. लठ्ठपणाने पुढे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. तसेच कमी वजनाचाही तोटा असतो. तुमच्या उंची,वय आणि लिंगानुसार योग्य वजन असणे गरजेचे असते.
जर तुम्ही खूपच बारीक आहात आणि कोणत्याही कारणाशिवाय तुमचे वजन घटत असेल. काहीही खाल्लेले अंगाला लागत नाही. किंवा वजन नियंत्रित राहत नाही यासंदर्भात बाबा रामदेव यांनी एक उपाय सांगितला आहे. या लेखात काय आहे हा उपाय हे पाहूयात…
कमी वजन असेल तर काय करायचे ?
बाबा रामदेव यांनी सांगितले की एका महिलेचे वजन लागोपाठ कमी होत होते. आणि एकदा स्थिती अशी आली तिचे वजन केवळ २८ किलो राहिले.त्यामुळे ती महिला रोजची कामे देखील करू शकत नव्हती. त्यानंतर तिने आपले वजन २८ वरुन ३८ किलो केले आहे. बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की वजन वाढवण्याची औषधे खाऊ नका, त्याऐवजी अश्वगंधा, शतावरी, केळे, आंबा,खजूर,दूध सारखे पदार्थ खावेत. याशिवाय योग करावा, ज्यामुळे तुम्ही हेल्दी वेट गेन करु शकता.
वेट लॉससाठी सांगितली योगासन
बबा रामदेव यांनी वजन कमी करण्याची काही योगासन सांगितली आहे. ती आसने तुम्ही रोज फॉलो करु शकतो. याने बॅली फॅट देखील कमी होईल. डायबिटीजने जे त्रस्त असतील त्यांनाही ही आसने उपयोगी आहे. सर्वात आधी मंडूकासन करावे,पवनमुक्तासन देखील एक सोपे आणि परिमाण कारक आहे.हे तुमच्या पाचनशक्तीसाठी बेस्ट आहे. बाबा रामदेव यांनी वेटलॉस साठी या योगा पोझ सिरीजमध्ये उत्तानपाद आसन, सर्वांगासन, हलासन, चक्कीचलनासन, अर्धनवासन, शलभासन करण्यासही सांगितले आहे.
लठ्ठपणाने येणाऱ्या समस्या
वजन वाढल्याने डायबिटीज सह अनेक हेल्थ प्रॉब्लेमची शक्यता वाढू शकते. जर वेट वाढत असेल सर्वात आधी आपल्या लाईफ स्टाईलमध्ये बदल करायला हवा. यात खानपान बॅलन्स करण्यापासून योगापासून वर्कआऊट डेली रुटीनमध्ये करावेत. यानंतरही जर वजन वाढत असेल तर तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List