“लोकांनी प्रश्न विचारले की आम्ही फटके देऊ, हाणामारी करू आणि…” छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण, रोहित पवारांचा संताप
पावसाळी अधिवेशनात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडल्याने चांगलाच राडा झाला. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.
राज्यातला शेतकरी प्रचंड संकटात असताना राज्याचे कृषिमंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनतेत संतापाचा आगडोंब उसळणारच आहे. या विषयावर लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे निवेदन देत असताना झालेला वाद दुर्दैवी आहे. तटकरे यांच्यावर अशा प्रकारे पत्ते फेकणे चुकीचेच आहे, परंतु त्यांनतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना करण्यात असलेली मारहाण अधिक चुकीची आहे. लोकांनी प्रश्न विचारले की आम्ही फटके देऊ, हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू हा संदेश सत्ताधारी देऊ पाहत आहेत का? असा सवाल रोहित पवार यांनी केला.
राज्यातला शेतकरी प्रचंड संकटात असताना राज्याचे कृषिमंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनतेत संतापाचा आगडोंब उसळणारच आहे.
या विषयावर लातूर येथे #छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांना निवेदन देत असताना झालेला वाद दुर्दैवी आहे. तटकरे साहेबांवर अशा प्रकारे पत्ते… pic.twitter.com/GGjI7eBVw9
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
नेमकं काय घडले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रविवारी लातूरला आले होते. त्यांच्यासोबत उदगीरचे आमदार संजय बनसोडे होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी ते बोलत असताना अचानक छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत येऊन राज्याच्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निषेधार्थ घोषणा देत कोकाटेंच्या राजीनामाची मागणी केली. कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी बसवा आणि पत्ते खेळायला द्या, असे म्हणत छावा कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर टेबलावर पत्ते फेकले. त्यानंतर ते दुसऱ्या खोलीत निघून गेले. थोड्या वेळाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, छावाचे कार्यकर्ते बसलेल्या खोलीत आले आणि त्यांनी जोरदार मारहाण सुरू केली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याने त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.
सुनील तटकरेंनी छावा संघटनेचा घेतला धसका, धाराशिवमध्ये पत्रकार परिषदेचे ठिकाण पाच वेळा बदलले
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List