भाजप आमदाराच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पोलिसांकडून चौकशी सुरू
कर्नाटकमधील भाजप आमदार प्रभू चौहान यांचा मुलगा प्रतीक चौहान याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीदर येथील पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून प्रतीकने चौहानने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडीत महिलेने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक चौहान याने 25 डिसेंबर 2023 ते 27 मार्च 2024 या काळात लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार बलात्कार केला. तक्रारीनुसार, पीडित महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असून ती 25 वर्षांची आहे. प्रतीकने तिला लग्नाचे वचन दिले आणि तिच्याशी साखरपुडाही केला होता. त्यानंतर प्रतीकने तिच्याशी नियमित संपर्क ठेवला आणि पुढे लग्नाचे वचनही दिले होते.
प्रतीकने तिला सप्टेंबर 2023 मध्ये बंगळुरूला बोलावलं आणि एका हॉटेलमध्ये पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केला. 25 डिसेंबर 2023 रोजी बीदर जिल्ह्यातील औराड तालुक्यातील घमसुबाई बोंठी तांडा येथे प्रतीकच्या घरी दोघांचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला प्रतीकचे कुटुंबीयही उपस्थित होते.
त्यानंतरही पीडितेच्या कुटुंबीयांनी वारंवार लग्नाची तारीख विचारली, पण प्रतीक आणि त्याच्या कुटुंबीयांनी काहीच उत्तर दिले नाही. पिडीत तरुणीला यात्रा आणि धार्मिक दर्शनाच्या नावाखाली लातूर, शिर्डी इत्यादी ठिकाणी नेले गेले, जिथे प्रतीकने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. एकदा प्रतीकने तिला आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या हातावर जखम करण्यास भाग पाडलं. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा त्यानेच ब्लेडने तिच्या हातावर खोल जखम केली असेही तक्रारीत म्हटले आहे.
पीडितेच्या कुटुंबाने लग्नासाठी प्रयत्न केले, पण प्रतीक आणि त्याचे वडील प्रभू चौहान यांनी 5 जुलै 2०2५ रोजी स्पष्ट नकार दिला. इतकंच नाही तर तुम्हाला जे करायचं ते करा असेही उत्तर त्यांनी दिले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List