गुप्तधनाच्या हव्यासातून 60 लाखांचा गंडा; 10 हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि 10 हजार सिगारेट्स जाळल्या
पैशांचा पाऊस पाडण्याचे आणि गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवत तांत्रिकाने एका तरुणाला 60 लाखांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. इंद्रदास वैष्णव असे तांत्रिकाचे नाव आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
उदयपूरच्या गोवर्धन विलास ठाणे हद्दीत ही घटना घडली. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील रहिवासी असलेला सत्यनारायण सुथार हा तरूण गेल्या वर्षी मित्रासोबत उदयपूरला फिरायला गेला होता. यावेळी त्याची तांत्रिक वैष्णवसोबत भेट झाली. वैष्णवने आपण जमिनीतून गुप्तधन काढण्यास सक्षम असल्याचे सत्यनारायणला सांगितले.
तांत्रिकाच्या आमिषाला बळी पडत तरुणाने वेळोवेळी त्याला थोडे थोडे करत असे एकूण 60 लाख रुपये दिले. तसेच पुजेच्या नावाखाली तांत्रिकाच्या सांगण्यावरून तरुणाने दहा हजार अत्तराच्या बाटल्या, एक हजार नारळ आणि दहा सिगारेट्स बरबाद केल्या. यानंतरही गुप्तधन न सापडल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. यानंतर तरुणाने तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List