Bangladesh Plane Crash – बांगलादेशात हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले, पायलटचा मृत्यू; अनेक जण जखमी
बांगलादेशात हवाई दलाचे प्रशिक्षण जेट F-7 BGI शाळेवर कोसळल्याची घटना सोमवारी घडली. बांगलादेशची राजधानी ढाका येथे उत्तरा परिसरातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या कॅम्पसमध्ये दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हे विमान कोसळले. या अपघातात विमानाच्या पायलटचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले.
शाळेच्या कॅम्पसमध्ये विमान कोसळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. शाळेच्या कॅम्पसचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरात सर्वत्र धूर पसरला आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात किती मृत्यू झाले याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही.
विमानाचा अपघात कोणत्या कारणातून झाला हे अद्याप कळू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच बांगलादेश लष्करी सैन्य, सिव्हिल डिफेन्स पथक आणि अग्नीशमन दल घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List