सुनील तटकरेंनी छावा संघटनेचा घेतला धसका, धाराशिवमध्ये पत्रकार परिषदेचे ठिकाण पाच वेळा बदलले
कृषीमंत्री माणिकाराव कोकाटे विधानपरिषदेत मोबाईलवर रमी खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून छावा संघटनेने लातूरमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत पत्ते फेकून जाब विचारला होता. त्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली होती. आता याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहे. छावा संघटनेने जागोजागी निदर्शनं केली असून घोषणाबाजी केली आहे.
लातूरमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली होती. आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या बाहेर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांना बाहेरच पडू दिले नाही.
दुसरीकडे लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच तटकरे आता धाराशिव दौऱ्यावर असणार आहेत. पण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीमुळे तटकरे यांनी पाच वेळा पत्रकार परिषदेचे ठिकाण बदलले. घटनेचे गांभीर्य पाहता धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जालन्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अज्ञात लोकांकडून दगडफेक करण्यात आली असून नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे पोस्टर बॅनर छावा संघटनेने फाडले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List