जनतेत संतापाची लाट; दिल्लीतही भाजप सरकारची पिछेहाट, ‘तो’ निर्णय घेतला मागे
जनतेच्या प्रचंड रेट्यापुढे भाजप सरकारला महाराष्ट्रात झुकावे लागले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विरोधाचे सूर उमटू लागल्यानंतर आणि ठाकरे बंधुंनी मोर्चाची एकत्र हाक दिल्यानंतर तंतरलेल्या भाजप सरकारने हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द केला होता. महाराष्ट्रानंतर आता राजधानी दिल्लीतही भाजप सरकारची पिछेहाट झाली असून जनतेच्या विरोधानंतर जुन्या गाड्या स्क्रॅप करण्याचा निर्णयाची तूर्तास अंमलबजावणई केली जाणार नाही. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. याबाबत दिल्ली सरकारने वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला (सीएक्यूएम) पत्रही लिहिले असून जुन्या गाड्या जप्त करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा सध्या ठीक नसल्याचे म्हटले.
Delhi Environment Minister Manjinder Singh Sirsa writes to the Commission for Air Quality Management to place on hold the enforcement of Direction No. 89, which mandates the denial of fuel to End-of-Life (EOL) vehicles in Delhi
“We urge the Commission to put the implementation… pic.twitter.com/mgg1Ymdaes
— ANI (@ANI) July 3, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List