वांद्रे पूर्व स्थानक परिसराच्या विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करा, वरुण सरदेसाई यांची मागणी
वांद्रे पूर्व स्थानक परिसराच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.
वांद्रे रेल्वे पूर्व स्थानक व आसपासच्या परिसराची दुर्दशा झाली आहे. या परिसरात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा मुख्यालय अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. रोज पाच ते सहा लाख नागरिकांची या परिसरात वर्दळ असते. मात्र रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षाचालकांवर कोणतेही नियंत्रण नाही. अवैध रिक्षा चालवल्या जातात. मीटरवर भाडे आकारले जात नाही. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सला जायचे असेल तर 300 ते 400 रुपये घेतले जातात. मागील अधिवेशनात या समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतरही काहीच कारवाई झालेली नाही. वांद्रे पूर्वेला असलेला स्काय वॉक पाडल्यानंतर अद्याप बांधला गेलेला नसल्याने पादचाऱ्यांना त्रास होत आहे, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List