पहलगाम हल्ल्याच्या जखमा अद्याप बऱ्या झाल्या नाहीत अन् हिंदुस्थान पाकिस्तानबरोबर हॉकी, क्रिकेट खेळणार? आदित्य ठाकरे आक्रमक
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत 26 माता-भगिनींचे कुंकू पुसले. यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. असे असतानाही हॉकी आशिया कप आणि ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाला हिंदुस्थानमध्ये येण्याचा हिरवा कंदिल देण्यात आला आहे. तसेच युएईमध्ये होणाऱ्या आशिया कप 2025 मध्येही हिंदुस्थान-पाकिस्तान संघात क्रिकेटचा सामना रंगण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले असून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.
देशात हॉकीचा आशिया कप होत आहे. आपल्या देशाच्या क्रीडा मंत्रालयाने पाकिस्तानला हिंदुस्थानात खेळण्यासाठी हिरवा कंदिल दिला आहे. कदाचित हा पहिला टप्पा असेल. पुढे क्रिकेटचा आशिया कप होणार आहे. बीसीसीआय, आयसीसीला थेट बोलता येत नाही म्हणून आधी हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामना हॉकीमध्ये होऊ द्यायचा. लोकाची भूमिका, भावना काय आहे हे पाहून क्रिकेटकडे वळायचे असे धोरण भाजपचे असेल तर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे आदित्य ठाकरे शुक्रवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
एप्रिलमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत हे कुणाला माहिती नाही. त्यांना अद्यापही पकडण्यात आलेले नाही. मध्यंतरी एनआयएने सांगितले की, दहशतवादी हल्ल्यानंतर जारी करण्यात आलेले स्केच चुकीचे होते. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरही आपले प्रतिनिधी मंडळ जगभरात गेले आणि मोठ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण यावर भाजपला वाटत असेल की आपण मते मिळवू शकतो, लोकांना फसवू शकतो, तर हे चालणार नाही. यावर केंद्र सरकारने उत्तर देणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
The terrorists from the Pahalgam attack haven’t been yet caught.
The wounds of that attack haven’t yet healed…
BUT the Union Government has given a clearance to pak playing in the Hockey Asia Cup, 2025, in India.
Then the next one is BCCI playing our Indian Team in the…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 4, 2025
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणाव आहे, मग आपल्या देशात होणाऱ्या आशिया कपमध्ये आणि युएईत होणाऱ्या क्रिकटेच्या आशिया कपमध्ये पाकिस्तान खेळणार की नाही? यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे. जर तुम्ही पाकिस्तानबरोबर खेळलात तर ही संस्था देशद्रोही ठरवणार का? गेल्या दोन महिन्यात पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. आशियाई विकास बँक, वर्ल्ड बँक आणि आयएमएफही कितीही प्रयत्न केले तर पाकिस्तानला फंड देत आहे. मग आपली मुत्सद्देगिरी, परराष्ट्र मंत्री काय करत आहेत? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. पाकिस्तानकडून दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई होईपर्यंत आपण जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैशांचा मोह आवरू शकत नाही का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List