Video – मल्ल्या – मोदीची लंडनमध्ये जोरदार पार्टी; एकत्र गायले-थिरकले, ललित मोदीनेच पोस्ट केला व्हिडीओ

Video – मल्ल्या – मोदीची लंडनमध्ये जोरदार पार्टी; एकत्र गायले-थिरकले, ललित मोदीनेच पोस्ट केला व्हिडीओ

लंडनमधील एका खासगी पार्टीत हिंदुस्थानातून फरार असलेले उद्योजक विजय मल्ल्या आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी एकत्र दिसले. दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघं एका गाण्यावर ताल धरताना दिसत आहे. त्यामुळे दोघंही पुन्हा एकदा चर्चेत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासह काही प्रसिद्ध व्यक्ती पार्टीत आनंद घेताना दिसतात. या कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू क्रिस गेलही उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडीओत हे दोघं फ्रँक सिनात्राचं प्रसिद्ध गाणं ‘आय डिड इट माय वे’ गाताना दिसत आहेत. ललित मोदीनेच हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला असून, तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

या पोस्टसोबत ललित मोदीने लिहिलं आहे की, ‘गेल्या रविवारी माझ्या लंडनमधील घरी झालेल्या पार्टीच्या काही सुंदर आठवणी शेअर करत आहे’. या पार्टीत 310 खास मित्र व कुटुंब असल्याने ही रात्र खास ठरल्याचेही तो म्हणतो. हा व्हिडीओ इंटरनेटवर जास्त व्हायरल होणार नाही, अशी आशा आहे. वादग्रस्त असलो तरी मी नेहमीप्रमाणेच स्वतःच्या मार्गाने चालतो’. ललित मोदींवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून ते हिंदुस्थानबाहेर वास्तव्यास आहेत. तर दुसरीकडे, विजय मल्ल्याविरुद्ध सुमारे 9,000 कोटी रुपयांचं कर्ज थकवल्याचे प्रकरण सुरू असून, दोघांच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानच्या सरकारने यूके सरकारकडे मागणी केल्याची माहिती आहे.

Vijay Mallya & Lalit Modi Party Together in London; Video Goes Viral

A video of absconding businessmen Vijay Mallya and Lalit Modi partying and singing “My Way” in London has gone viral, sparking fresh controversy.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पनवेलमध्ये शाखाप्रमुखांचा दणदणीत मेळावा; आम्ही लढणार.. आम्ही जिंकणार! शिवसेना नेते अनंत गीते यांचा विश्वास पनवेलमध्ये शाखाप्रमुखांचा दणदणीत मेळावा; आम्ही लढणार.. आम्ही जिंकणार! शिवसेना नेते अनंत गीते यांचा विश्वास
सत्ताधाऱ्यांचे विविध घोटाळे रोज बाहेर येत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल. या निवडणुका आम्ही लढणार...
Air India Plane Crash- विमान कंपनी आणि यूकेच्या लॉ फर्ममध्ये वाद, नुकसान भरपाईच्या नावाखाली अनावश्यक माहिती मागवल्याचा केला आरोप
गिरीश महाजन गुंड टोळ्या चालवतात, त्यांची 100 प्रकरणं माझ्याकडे आहेत! संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
मराठी संतावर पहिला पाश्चात्त्य चित्रपट; संत सावता माळी यांच्या जीवनावरील चित्रपट येणार भेटीला
Chhatrapati Sambhajinagar Accident – डोळ्याचे पाते लवत नाही तोच भरधाव कारने 6 जणांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू
डोंगरात टाकले लाखावर बीजगोळे; पर्यावरण संवर्धनासाठी मान्याचीवाडी ग्रामस्थांचा उपक्रम
घरमालकीणीच्या मृत्यू दिवशीच तिच्या सोन्यावर डल्ला, घरकामगार महिलेला अटक