Health Tips – दररोज इतका वेळ चाला म्हणजे निरोगी राहाल, वाचा

Health Tips – दररोज इतका वेळ चाला म्हणजे निरोगी राहाल, वाचा

चालण्याचा व्यायाम हा सर्वात उत्तम आणि सोपा व्यायाम म्हटला जातो. परंतु अलिकडे आपले चालणे खूपच कमी झाले आहे. चालण्यामुळे आपल्या शरीर सुदृढ राहते, तसेच आपण निरोगी देखील राहण्यास मदत होते. सध्या मात्र आपले चालणे अगदी दुरापास्त झाले आहे. न चालण्यामुळे केवळ एका जागी बसून काम केल्यामुळे, आपल्या शरीरामध्ये रोगांचा शिरकाव होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

दिवसातून किमान अर्धा तास आपण चाललो तर आपण भविष्यातही निरोगी राहू असा सल्ला आता तज्ज्ञ देताहेत. अर्धा तास चालण्याचे शरीरासाठी खूप सारे फायदे होतात. टाइप-2 मधुमेह, हृद्यविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, जडत्व, कर्करोग आदी रोगांवर आपण फक्त अर्धा तासाच्या चालण्याने मात करू शकतो.

दिवसातून 30 मिनिटे चालण्यामुळे, वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबरीने हृद्याचे आरोग्य उत्तम होण्यास मदत होते. चालणे कसे असावे हाही एक महत्त्वाचा भाग आहे. तर सलग 30 मिनिटे चालणे हे गरजेचे आहे. थोडे थांबून पुन्हा चालणे चालू ठेवायचे हे असे योग्य नाही. आरोग्यासाठी चांगला फायदा हवे असल्यास, न थांबत तीस मिनिटे चालायलाच हवे. पूर्वापार चालत आलेल्या विविध म्हणी आपणास पाठ आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला ‘चालाल तर वाचाल’ ही नवीन म्हण आपण आपल्यासाठी तयार करणे आता क्रमप्राप्त आहे.

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपले चालणे हे खूप कमी झालेले आहे. त्यामुळेच नानाविध राेगांची सुरुवात शरीरामध्ये होण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या घडीला आजूबाजूला सजगपणे पाहिल्यास हृदयरोग, वजनवाढ, मधुमेह हे आजार जवळपास पाचपैकी चार जणांना असतात.

चाळीशीच्या वयोगटामध्ये सध्याच्या घडीला मधुमेहाची गतीने वाढ होताना दिसत आहे. यावरच उपाय म्हणून तज्ज्ञांच्या मते दिवसातून किमान अर्धा तास चालण्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

हाडांच्या स्नायूसाठी चालणं हा एक उत्तम व्यायाम समजला जातो. अनेक महिलांमध्ये तसेच पुरुषांमध्ये सध्याच्या घडीला ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा वाढू लागला आहे. या जोडीला सर्कोपनिया या रोगामुळे स्नायूंची  वजन कमी होऊन काम करण्याची क्षमताही कमी होऊ लागली आहे. या सर्व आजारांवर मात करण्यासाठी अर्धा तास चालणे हा एक बेस्ट पर्याय आहे. रोज किमान अर्धा तास चालण्यामुळे, मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. मानसिक शांती मिळते. तसेच झोपेची गुणवत्ता सुधारते.

(कोणतेही उपाय किंवा उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;