पुण्यात ‘जय गुजरात’ म्हणत मिंधेंचे अमित शहांसमोर लोटांगण; महाराष्ट्रात संतापाची लाट
आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडत आहेत. हिंदी सक्तीविरोधात महाराष्ट्रातील जनतेने एकवटून राज्य सरकारला निर्णय रद्द करण्यास भाग पाडलं आहे. असे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
पुण्यात ‘जय गुजरात’ म्हणत मिंधेंचे अमित शहांसमोर लोटांगण; महाराष्ट्रात संतापाची लाट pic.twitter.com/RLGHdhGlhH
— Saamana Online (@SaamanaOnline) July 4, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या हस्ते कोंढवा बुद्रुक येथील जयराज स्पोर्टस कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी अमित शहांचं भरभरून कौतुक केलं. हिंदीत भाषणाचा शेवट करताना ‘जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात’अशी घोषणा दिली. अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेत संतापाची लाट उसळली आहे. अमित शहांना खूश करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा करण्यासाठी लोटांगण घातल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे.
‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’ उद्योजक सुशील केडियाची मुजोरी
सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये आमचा पक्ष सोडला, पक्षाचं जे काही केलं तेव्हा यांनी सांगितलं होतं की मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊन चाललो आहे, असा दावा केला होता. मात्र बाळासाहेबांचे विचार जय गुजरात कधीच होऊ शकत नाहीत. जय हिंद हे राष्ट्र प्रेम आहे, जय महाराष्ट्र हे राज्याबद्दलचं प्रेम आहे. पण जय गुजरात?? हे अमित शहांना खूश करण्यासाठी आणि त्यांच्या खूशमतीमध्ये जे काही मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी होतं, त्याचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List