‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’ उद्योजक सुशील केडियाची मुजोरी

‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’ उद्योजक सुशील केडियाची मुजोरी

महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादाने एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादाचे रूप धारण केले आहे. आता केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीच्या वादात उडी घेतली आहे. त्यांच्या सोशल मीडियावर सार्वजनिकरित्या त्यांनी जाहीर केले आहे की, ते मराठी शिकणार नाहीत.

राज ठाकरे यांना एक्स वर टॅग करताना केडिया यांनी लिहिले की, गेली 30 वर्षे मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, हे पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला? असं सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना आव्हान केलं आहे.

मीरा रोडवरील दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्याला चोप दिला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, केडिया यांचे हे विधान आले आहे.

मीरा भाईंदरमधील घटनेनंतर मराठी माणूस पेटून उठला, घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावेच लागेल असे केडियाला आता लोक सोशल मीडियावर सुनावत आहेत. मीरा भाईंदर परिसरामध्ये मराठी माणसांवर सध्याच्या घडीला होत असलेल्या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्यासाठी आता मराठी माणूस पेटून उठला आहे. मराठी माणसाला घरे न देणे तसेच समाजात तेढ निर्माण करणे अशा विविध मार्गांनी मराठी समाजाला सतावले जात आहे. त्यामुळेच आता या अन्नायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी समस्त मराठीजन एकवटला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत जीवन संपवणाऱ्या तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल Ratnagiri News – रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत जीवन संपवणाऱ्या तरुणीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल
प्रेमप्रकरणातून रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेणाऱ्या तरुणीच्या प्रियकराविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसस्मिक केहर सिंग असे प्रियकराचे नाव आहे....
Ratnagiri News – माता ना तू वैरीणी… निष्ठुरतेचा कळस; पैशांसाठी जन्मदातीने मुलाचा केला सौदा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा; नाना पटोले यांची मागणी
महायुती सरकारच्या काळात 2 हजार 866 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, अंबादास दानवे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात आक्रमक
Beed News – क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी, डॉ. सुदाम मुंडेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Beed News – विकास निसर्गाच्या मुळावर; बीड-परळी रस्ता रूंदीकरणासाठी तीन हजार झाडांची कत्तल
चयापचयची प्रक्रिया मंद किंवा जास्त झाल्यावर शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून