Short news – चीन हिंदुस्थानचा कणा मोडतोय, मल्लिकार्जून खरगे यांची मोदी सरकारच्या धोरणावर टीका
हिंदुस्थान आणि चीनच्या संबंधावरून पुन्हा राजकारण तापले आहे. चीन आपल्या देशाचा कणा मोडतोय आणि मोदी सरकार गप्प बसले आहे, अशा शब्दांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांनी मोदी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे. हिंदुस्थानात काम करणाऱ्या इंजीनियर्सना चीनने परत बोलावून घेतल्यावरून खरगे यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.
सत्येंद्र जैन यांची ईडीकडून चौकशी
आप नेते सत्येंद्र जैन यांची आज ईडीने चौकशी केली. पीएमएलए कायद्यांतर्गत दिल्ली जल बोर्ड घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांचा जबाब नोंदवला. 2002 मध्ये ईडीने त्यांना अटक केली होती. मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती असल्याप्रकरणी ईडीने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक
इंफाळ येथे तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रीपाक या मैतराम परिसरातील बंदी घातलेल्या संघटनेचे हे सर्व दहशतवादी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यातील एकाची ओळख पटली असून ओईनम हेमनजित सिंह(57) असे त्याचे नाव आहे. ओईनम सिंह याचा काकचिंग आणि थौबल जिह्यातील विविध पेट्रोलपंपांवरून खंडणी वसूल करत होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List