मालीत तीन हिंदुस्थानींचे अपहरण, आफ्रिकी देशांतील नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंता
पश्चिम आफ्रिकेतील माली या देशातील विविध भागात दहशतवादी हल्ले झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यानंतर मालीमध्ये तीन हिंदुस्थानी नागरिकांचे अपहरण करण्यात आले. या घटनेनंतर आफ्रिकन देशांतील हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेबद्दल हिंदुस्थानने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर जाण्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच 1 जुलै रोजी हल्ल्याची घटना घडली. दरम्यान, हिंदुस्थान सरकारने नागरिकांची लवकर सुटका करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय करण्याचे आवाहन माली सरकारला केले आहे.
1 जुलै रोजी कायेस येथील डायमंड सिमेंट करखान्यात काम करणाऱ्या तीन हिंदुस्थानी नागरिकांना कारखान्याच्या परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ओलिस ठेवण्यात आले.
अल कायदाचा हल्ला असण्याची शक्यता
या अपहरणाची जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही. मात्र, अल कायदाशी संबंधित गट जमात नुसरत अल इस्लाम वार मुस्लिमिनने त्याच दिवशी करण्यात आलेल्या मालीमधील इतर हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, बामको येथील हिंदुस्थानी दूतावास हा संबंधित मालियन अधिकारी, स्थानिक कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणाच्या संपर्कात असल्याचे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List