50 लाखांची कॅन्सर निदान व्हॅन 99 लाखांना, भास्कर जाधव यांच्या मागणीनंतर चौकशी
आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन बाजारभावापेक्षा दोन-तीन पट जादा दराने खरेदी केली. 45 ते 50 लाख रुपयांची एक व्हॅन 99 लाख रुपयांना खरेदी केल्याचा आरोप शिवसेनेचे गट नेते भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सर निदानासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन खरेदी केल्या. ही खरेदी करताना पुरवठादार कंपनीबरोबर संगनमत करून नियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे काय, असा सवाल भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केला. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार या चर्चेत भाग घेताना म्हणाले की, एका व्हॅनची किंमत चाळीस लाख रुपयांपेक्षा अधिक होऊ शकत नाही. या व्हॅनमधील यंत्र बारा लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. या खरेदीत भ्रष्टाचार आहे. याबाबत चौकशी सुरू आहे. मग अजून अहवाल का आलेला नाही, असा सवाल त्यांनी केला.
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा!
दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद केली आणि दुसरीकडे दादर-गोरखपूर आणि दादर-बालिया या गाडय़ा सुरू करून रेल्वेने कोकण व महाराष्ट्रातील जनतेची पूर चेष्टा चालवली आहे अशी खंत शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी आज विधासभेत व्यक्त करत दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List