Somnath Suryawanshi – सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा, खंडपीठाचे आदेश
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात बाजू मांडली होती.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीतच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीतच झाल्याचे पुराव्यातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशासंदर्भात प्रकाश आंबेडकर हे आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.
Somnath Suryavanshi सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी फौजदारासह चार पोलीस निलंबित
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List