मीरा भाईंदरमधील घटनेनंतर मराठी माणूस पेटून उठला, घेतला मोठा निर्णय
मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे या भागातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. मनसेकडून झालेल्या या मारहाणीनंतर, परीसरातील अमराठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुनच निषेध व्यक्त केला. तसेच तेथील व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील काढला होता. या सर्व घडामोडीनंतर आता मराठी माणूस जागा झाला आहे. आता सर्व मराठी राजकीय संघटना तसेच राजकीय पक्षातील मराठी प्रतिनिधी आणि सोबत मराठी जनता आज संध्याकाळी 6 वाजता पोलीस उपायुक्तांची भेट घेणार आहेत.
जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकान मालकाने मराठी भाषा कशाला बोलायला हवी असे वक्तव्य केले होते. यानंतर मनसेचे कार्यकर्ते त्या दुकानदाराला जाब विचारण्यास गेले. त्याक्षणी देखील दुकानमालकाने हेकेखोरपणे मराठी न बोलण्यावर ठाम होतो. संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी दुकानमालकाच्या कानाखाली सणसणीत लगावून दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, तिथल्या दुकानदारांकडून दुकाने बंद ठेवून तसेच जमाव गोळा करुन पोलिसांवर दबावाचे तंत्र वापरण्यात येत आहे. म्हणूनच (4 जुलै) संध्याकाळी 6 वाजता सर्व मराठी संघटना तसेच राजकीय पक्षातील मराठी प्रतिनिधी आणि मराठी जनता एकत्र येऊन पोलिस उपायुक्तांची भेट घेणार आहेत. भेटीदरम्यान, मराठी समाजावर होत असलेला अन्याय तसेच पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि शहरात निर्माण होत असलेला तणाव याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
मीरा भाईंदर परिसरामध्ये मराठी माणसांवर सध्याच्या घडीला होत असलेल्या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्यासाठी आता मराठी माणूस पेटून उठला आहे. मराठी माणसाला घरे न देणे तसेच समाजात तेढ निर्माण करणे अशा विविध मार्गांनी मराठी समाजाला सतावले जात आहे. त्यामुळेच आता या अन्नायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी समस्त मराठीजन एकवटला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List