तळीये गावातील सर्व दरडग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन करा! अंबादास दानवे यांची मागणी
महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला 4 वर्षे होऊनही तेथील कुटुंबीयांचे अद्याप पूर्णतः पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या पावसाळय़ातही अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी त्या कुटुंबीयांचे लवकर पुनर्वसन करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारकडे केली.
पुण्यातील माळीण गाव, रायगड जिह्यातील महाडचे तळीये व कर्जत तालुक्यातील एका वाडीवर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत अनेक गावकरी मृत्युमुखी पडले. मात्र, सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही. अद्यापही येथे पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि निवासाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे नागरी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तळीये गावात दरड कोसळून 66 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला, परंतु येथील केवळ 66 कुटुंबांनाच घरे मिळाली असून अनेक कुटुंबे अजूनही असुरक्षित ठिकाणी राहत आहेत. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात यावी अशी सूचना अंबादास दानवे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List