मुलं तासन्तास मोबाईल पाहत असतील तर…
छोटी मुले मोबाईलला चिकटलेली असतात. ते तासन्तास मोबाईल पाहत असतात. मुलांना मोबाईलपासून दूर रहा असं सांगूनही ते ऐकत नसतील तर काही सोप्या टिप्स आहेत.
मुले घरात असतील तर त्यांना घरातील कामात गुंतवून ठेवा. घरातील कामात मदत करायला सांगा. असे केल्याने त्यांचा स्क्रीन टाईम आपोआप कमी होईल.
मुलांना मोबाईल पाहायला देण्याऐवजी त्यांना घरातील खेळ खेळायला सांगा. यामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता वाढेल. मोबाईलपासून दूर राहतील. खेळाविषयी आवड निर्माण होईल.
घरात जास्त सदस्य असतील तर मुलांसमोर फोन घेऊन बसू नका. ते तुमचे अनुकरण करतील. त्याऐवजी एकमेकांशी गप्पा मारा. मुलांना त्यात सहभागी करून घ्या.
मुलांसमोर पुस्तके वाचा. तसेच त्यांनाही पुस्तके वाचायला सांगा. वाचनाची आवड निर्माण होईल. मुलांना जास्त वेळ मिळत असेल तर त्यांना संगीत, तबला, बुद्धिबळ यांसारखा एखादा क्लास लावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List