पनवेलमध्ये शाखाप्रमुखांचा दणदणीत मेळावा; आम्ही लढणार.. आम्ही जिंकणार! शिवसेना नेते अनंत गीते यांचा विश्वास
सत्ताधाऱ्यांचे विविध घोटाळे रोज बाहेर येत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल. या निवडणुका आम्ही लढणार आणि जिंकणारच, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या लोकोपयोगी कामांचा धडाका घराघरापर्यंत पोहोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.
पनवेल महानगर क्षेत्रातील सर्व शाखाप्रमुखांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आखणी तसेच पदाधिकाऱ्यांची जबाबदारी याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना नेते अनंत गीते यांनी सांगितले की, शाखाप्रमुख हे पद अतिशय महत्त्वाचे असून लोकांचा विश्वास संपादन करून कामाच्या जोरावर नगरपालिका तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका शिवसेना जिंकणारच, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
या मेळाव्यास शिवसेना उपनेते बबन पाटील, सुरेंद्रनाथ (बाळ) माने, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, अवधेश शुक्ला, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दीपक घरत, महानगरप्रमुख अवचित राऊत, शहरप्रमुख रामदास गोवारी, सदानंद शिर्के, यतीन देशमुख, सूर्यकांत म्हसकर, प्रवीण जाधव यांच्यासह सर्व शाखाप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List